शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलने साहित्यिकांची जीवनवाहिनी

By admin | Updated: March 16, 2017 01:59 IST

साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते.

बारामती : साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते. तसेच दर्जेदार साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांसाठी साहित्य संमेलने जीवनवाहिनीप्रमाणे असतात, असे मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.बारामती येथे १२वे राज्यस्तरीय मराठी साहित्यिक व कलावंत संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, की साहित्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. साहित्यामुळे संस्कृती कळते. सर्व जगात मराठी साहित्याचा गौरव होत असताना पाश्चिमात्य संस्कृती, साहित्याचा होत असलेला अतिरेक थांबला पाहिजे. साहित्यिकांना राजाश्रय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मराठी साहित्य हे आदर्शवादी व गौरवास्पद आहे. त्याचा आदर्श प्रत्येक साहित्यकाने घेण्याचे आवाहन आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.साहित्य संमेलने ही काळाची गरज असून साहित्यिक, कलावंत यांना ऊर्जा देण्यासाठीच गेल्या सहा वर्षांपासून हा लढा चालू आहे. शासन मदत करो अथवा न करो; परंतु साहित्यिकांना संमेलनाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष बी. डी. गायकवाड यांनी सांगितले. या प्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी १० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. अनिल सातव यांनी आभार मानले.या वेळी आमदार अ‍ॅड. रामहरी रूपनवर, किशोर शहा, नेहा शहा, संमेलनाध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, कविसंमेलनाचे अध्यक्ष लोककवी मदन देगावकर, स्वागताध्यक्षा नीता बारवकर, रानकवी जगदीप व बी. डी. गायकवाड, अनिल सातव, सचिव राधिका अनपट, नाजनील शेख, उमेश शिंदे, प्रदीप कोथमिरे यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते.