जोशी म्हणाले, ‘उल्हास पवार आणि चंद्रकांत शेवाळे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने सलग १५ वर्षे विश्वस्त आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. कार्यकारी मंडळाने कालानुरुप काही बदल करायचे ठरवले. त्यानुसार, निर्णय घेतल्यास त्याचे स्वागतच केले पाहिजे. ३१ मार्च २०२१ रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विश्वस्त मंडळातील सदस्य यांची मुदत संपल्यानंतर परिषदेने या सर्व मंडळींना आभार मानणारी पत्रे परिषदेच्या वतीने पाठवण्यात आली.’ त्या पत्रांना उल्हासदादा आणि चंद्रकांत शेवाळे वगळता सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तारा भवाळकर यांनी ‘सहकार्यासाठी कार्यकारिणीच्या सर्व सभासदांचे आभार, पुढील कार्यकारिणीचे अभिनंदन. सभासद म्हणून मसापशी संबंध कायम राहणारच आहेत’, या शब्दांत भावना व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
--------------------
राजीव बर्वे यांनी मिलिंद जोशी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि ते पराभूत झाले होते. निवडणूक झाल्यावर विविध उपक्रमांतून ते साहित्य परिषदेशी जोडले. विद्यमान कार्यकारिणीबरोबर काम करण्याची इच्छा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे उपाध्यक्ष म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. साहित्य परिषद विरोधकांनाही सामावून घेते, हीच भूमिका यातून पुढे आणण्याचा विचार आहे.
- प्रा. मिलिंद जोशी