शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

साहेब, एकाकडेच तीन रेशनिंग दुकाने

By admin | Updated: March 17, 2016 03:06 IST

‘‘साहेब, एकाच माणसाकडे तीन तीन रेशनिंगची दुकाने आहेत. चार-चार महिने धान्य देत नाय... माझं काय कोण करू शकत नाय... अशी दमदाटी करतो... तुम्ही तरी न्याय द्या...’’

बारामती : ‘‘साहेब, एकाच माणसाकडे तीन तीन रेशनिंगची दुकाने आहेत. चार-चार महिने धान्य देत नाय... माझं काय कोण करू शकत नाय... अशी दमदाटी करतो... तुम्ही तरी न्याय द्या...’’ रेशनिंगच्या धान्यासाठी शिरष्णे गावातील पिंगळेवस्ती (ता. बारामती) वरील ग्रामस्थांनी बुधवारी थेट बारामती गाठली. त्यांच्याव्यथा ऐकल्यानंतर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला, तर अन्य दोन दुकानांना टाळे ठोकण्यात आले. धान्यपुरवठा अनियमित होतो. त्याची तक्रार केली तर तहसील कार्यालयातूनच तक्रारदाराचे नाव त्याला सांगितले जाते. त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा त्या ग्रामस्थाला अरेरावी केली जाते, अशा तक्रारींचा पाढाच त्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर वाचला. पांढरेवाडी, शिरष्णे, पिंगळेवस्ती या तीन ठिकाणची स्वस्त धान्य दुकाने एकाच व्यक्तीकडे आहेत. त्याच्याकडून अनियमित धान्यपुरवठा होतो. काही मंडळींना तर चार महिन्यांपासून धान्यच दिले नाही. काहींचा मागील महिन्यातील धान्यपुरवठा झालेला नाही, तर दिलेले धान्य शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा कमी आहे. दुकानदाराच्या अरेरावीमुळे ग्रामस्थ हतबल झाले. त्यामुळे आज वयाची सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांपासून ते तरुणापर्यंतची सर्व मंडळी महिलांसमवेत बारामतीला आली. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. आम्हाला कुरणेवाडीतील धान्य दुकानदाराकडून धान्य मिळावे, अशी मागणी केली. पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय तहसीलदारांनी घेतला. आम्हाला धान्य मिळाले नाही तरी चालेल, परंतु, त्याचे दुकान बंद करा. लय वैताग दिलाय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही जा, माझं कोण काय करणार नाही, असा तो दुकानदार सतत म्हणतो. इकडं आम्ही उपाशी मेलो तरी चालते, पण तो काय धान्य देत नाही. त्यामुळे आम्ही न्याय मागण्यासाठी आलोय, असे ग्रामस्थ सांगत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रूदेखील होते. कबाजी भाऊ सरक, लक्ष्मण मारुती पिंगळे, आक्का दगडे, इजाबाई सरक, सिंधूबाई सरक, मंगला होळकर, सुनंदा कोळेकर, छाया हाके, आज्याबाई माने, विठ्ठाबाई जाधव, सविता पिंगळे, रकमाबाई पिंगळे, उज्ज्वला लोखंडे, संगीता पिंगळे, सुलाबाई कोळेकर, मंगल गोफणे, नारायण बिचकुले, अनिता पिंगळे, मंगल धायगुडे, पार्वती बरकडे, सीलाबाई माने, गजराबाई हाके आदी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठले. आम्हाला धान्य पाहिजे, अशी मागणी करीत असताना सध्याच्या धान्य दुकानदाराकडून होत असलेल्या त्रासाचा पाढा त्यांनी वाचला. महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उघडताच राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे यापूर्वी कारवाई टळली होती. आज मात्र ग्रामस्थांनी आम्हाला न्याय मिळण्यासाठी काहीही करू, अशी भूमिका घेतल्यानंतर कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)परवाना रद्द करण्याचा यापूर्वीच प्रस्ताव...तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले, की तक्रारीनुसार एका दुकानाची चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य असल्याचे आढळले. शिरष्णेच्या दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामस्थांना धान्याची पर्यायी व्यवस्था होण्यासाठी कुरणेवाडी येथून तातडीने केली जाईल. 1यासंदर्भात तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले, की शिरष्णेच्या दुकानाचा परवाना रद्द केला आहे. त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक एस. एस. शिंदे यांनी आज पांढरेवाडी, पिंगळेवस्ती येथील दुकानांचीदेखील पाहणी केली. त्यानुसार या दोन दुकानांना सील करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 2नायब तहसीलदार विलास करे यांनी सांगितले, की सील करण्यात आलेल्या दोन्ही दुकानांचे परवाने रद्द होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ग्रामस्थांना तातडीने धान्यपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. तिन्ही दुकानांचा परवाना रद्द झाल्यावर नव्याने अध्यादेश काढून परवाने देण्यात येणार आहेत.यापूर्वी दुकान बंद करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडून आला आहे. त्यानुसार दुकानदार शंकर खलाटे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी कळविले होते. मात्र, ते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार तातडीने शिरष्णे येथील दुकानाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला ़ज्योती कदम, पुरवठा अधिकारी