शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब दोन हजार तरी द्या! बहीण दवाखान्यात आहे - ‘भावा’ची आर्त विनवणी

By admin | Updated: November 17, 2016 01:43 IST

माझी बहीण दवाखान्यात अ‍ॅडमिट आहे. तिच्या उपचाराला पैशांची लय गरज आहे. घरात दुसरं कोणी नाही म्हणून मी मुंबईवरून आलो आहे.

सोमेश्वरनगर : माझी बहीण दवाखान्यात अ‍ॅडमिट आहे. तिच्या उपचाराला पैशांची लय गरज आहे. घरात दुसरं कोणी नाही म्हणून मी मुंबईवरून आलो आहे. माझ्याकडेही अजिबातच पैसे नाहीत. साहेब काय बी करा....पण दोन हजार तरी द्या, अशी विनवणी खंडोबाचीवाडी (ता. बारामती) येथील शेतकऱ्याचा मुलगा प्रशांत लकडे जिल्हा बँक अधिकाऱ्यांना करत होता. हे पाहून अगादेरच पैशांच्या तुटवड्यामुळे अडचणीत सापडलेले बँक अधिकारी निरुत्तर होत होते. लकडे यांची बहीण दीपाली लकडे यांचे पासबुक होते. दीपाली लकडे सद्या, नीरा, ता. पुरंदर येथील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असून, प्रशांत हा सोमेश्वर येथील दीपालीच्या खात्यावरील दोन हजार रुपये काढण्यास आला होता. पैसे न मिळल्याने तो हताश झाला होता. पैसे मिळावेत म्हणून तो बँक कर्मचाऱ्यांना वारंवार विनवण्या करीत होता. साहेब काही करा, फुटका रुपया खिशात नाही. बहीण दवाखान्यात आहे. मेडीकलला पैसे नाहीत, रक्त तपासणीसाठी पैसे लागतात, सोनोग्राफीला पैसे लागतात, काय करू मी सांगा... अशा प्रकारच्या विनवण्या तो आधिकाऱ्यांना करीत होता. परिस्थितीचे भान ओळखून शाखा व्यवस्थापक गायकवाड यांनी त्याला दोन हजार रुपये मिळवून दिले. जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली आहे. तसेच सोमेश्वरनगर येथील पुणे जिल्हा बँकेत १२ आणि १३ तारखेला तर पैसेच नव्हते. दि. १४ रोजी सोमेश्वर शाखेकडे ६ लाख रुपये आले. तेही सर्व दोन हजारांच्या नोटा. यातील सोमेश्वर शाखेने मुरूम शाखेला एक लाख आणि निंबुत शाखेला एक लाख दिले. सोमेश्वर शाखेने दि. १४ रोजी शंभर खातेदारांना प्रत्येकी फक्त दोन हजार रुपये याप्रमाणे दोन लाख रुपयांचे वाटप केले. तर, दि. १५ रोजी प्रत्येकी दोन हजार प्रमाणे दोन लाखाचे वाटप केले. हातात दोन हजाराची नोट मिळूनही ग्राहकांना त्यांचा लगेच उपयोग होत नव्हता. त्याचा पुढील प्रवास सुरू व्हायचा तो सुट्टे मिळविण्यासाठी. दिवसाला ग्राहकांची मागणी १५ ते २० लाखांची असताना बँकेला अवघ्या दोन लाख रुपयांवर भागवावे लागत आहे. आज सकाळी बँक उघडल्यावर पैशांसाठी एकच झुबड उडाली. मात्र, अवघ्या अर्धा तासातच दोन लाख रुपये संपले. मात्र, पैसेच संपल्याने बँक प्रशासनाने राहिलेले पासबुक परत देण्यास मदत केली. (वार्ताहर)