शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

‘सह्याद्री’ची सुधागड-सरसगड मोहीम यशस्वी

By admin | Updated: November 30, 2015 01:17 IST

रायगड जिल्हा : साताऱ्यासह, सांगली, पुणे येथील युवकांचा सहभाग

सातारा : रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र पालीच्या बल्लाळेश्वराचे पवित्र सान्निध्य लाभलेले सुधागड व सरसगड हे बुलंद किल्ले, येथील सह्याद्री ट्रेकिंगने आयोजित केलेल्या साहसी गडकोट मोहिमेदरम्यान अनेक ट्रेकर्सनी यशस्वी पूर्ण केले. अनुभवी गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या साहसी मोहिमेत सातारा, सांगली, कोरेगाव, पिंपरी-चिंचवड पुणे येथील गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता. कोरेगाव येथील ‘शर्वीन गोसावी’ हा दहा वर्षे वयाचा सर्वांत लहान गिर्यारोहक सहभागी झालेला होता. तीन दिवस चाललेली ही मोहीम सर्वार्थाने आव्हानात्मक ठरली. कोकणातील हवेतील दमटपणा, उकाडा, तीव्र उन्हाचा प्रचंड त्रास, सरळ उंच चढाई, दमछाक करायला लावणारी ही अवघड मोहीम सर्वांनीच यशस्वी पूर्ण केली. सरसगडावर सरळ उंचीच्या पायऱ्या चढाव्या लागतात. कड्यामध्ये खोदलेल्या या पायऱ्यांचा मार्ग नैसर्गिक तयार झालेल्या खिंडीतून जातो. याच्या बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी छोटेसे प्रस्तरारोहण करावे लागले. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सह्याद्री ट्रेकिंगचे प्रशिक्षित गिर्यारोहक सनी यवतकर, प्रतीक साळुंखे, मानसी सदामते, उर्वशी पवार, अभिजित धुमाळ, निखील सावंत, अजिंक्य कदम, अनिल दाणी, अथर्व अवसरे, प्रणव महामुने यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)सह्याद्रीचे विहंगम दृश्यसुधागडावर जाण्यासाठी अक्राळविक्राळ खोल दरीवरील लटपटत्या लोखंडी शिड्या पार करताना काळजाचा ठोका चुकतो. येथील टकमक टोकाचा खोल कडा पाहताना छातीत धडकी भरते. ५५ एकरांच्या विस्तीर्ण सुधागडावरून राकट सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहताना चिमुकले ट्रेकर्स भरावून गेले. येथून तेलबैला, सरसगड, धनगड व कोरीगड हे किल्ले अप्रतिम दिसतात. सर्वच सहभागी ट्रेकर्सनी प्रतिकूल हवामानावर मात करून कौतुकास्पद चढाई केली.