शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचा केशर, मंगळवेढ्याची ज्वारी टपाल तिकिटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठवाड्याचा केशर आंबा, मंगळवेढ्याची ज्वारी यांंना भारतीय टपाल खात्याने तिकिटांवर स्थान दिले आहे. यासोबतच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठवाड्याचा केशर आंबा, मंगळवेढ्याची ज्वारी यांंना भारतीय टपाल खात्याने तिकिटांवर स्थान दिले आहे. यासोबतच उत्पादक ते ग्राहक यांच्यात या मालाच्या वाहतुकीची जबाबदारीही टपाल खात्याने घेतली आहे.

केंद्र सरकार, टपाल खाते व राज्य कृषी विभाग यांच्यातील समन्वयातून हे साध्य झाले आहे. आंबा, ज्वारीपाठोपाठ नाशिकची द्राक्ष, पुरंदरचे अंजिर, नागपूरची संत्री यांनाही लवकरच टपाल खात्याच्या पाकिटावर स्थान मिळणार आहे. फक्त शेतमालच नव्हे तर सोलापूरची चादर आणि टॉवेल यांनीही टपाल खात्याला आकर्षित केले असून तेही पाकिटावर झळकले आहेत.

या सर्व उत्पादनांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे त्यांना भौगोलिक चिन्हांकन-जीआय मिळाले आहे. केंद्र सरकारच्या एका संस्थेकडून उत्पादनाचा दर्जा, उपयोगिता, एकसारखेपणा असे अनेक निकष लावून हे चिन्हांकन दिले जाते. राज्याच्या कृषी व निर्यात विभागाने गेली काही वर्षे सातत्याने केलेल्या प्रयत्नातून राज्यातील २८ उत्पादनांना असे चिन्हांकन मिळाले आहे.

गुणवत्ता असूनही या उत्पादनांना अपेक्षित प्रसिद्धी मिळत नव्हती. खासगी कुरियर कंपन्यांच्या स्पर्धेत काहीसे मागे पडलेल्या टपाल खात्याचा यात उपयोग होईल ही कल्पना पुढे आली. अल्पावधीतच ती अमलातही आली. महत्त्वाच्या घटनांचे स्मरण राहण्यासाठी टपाल खात्यातर्फे विशेष तिकिटे, पाकिटे प्रसिद्ध करण्यात येतात. त्याचा वापर या उत्पादनांसाठी करून घेण्यात आला आहे.

औरंगाबाद टपाल विभागाने नुकतीच मराठवाडा केशरची तिकिटे आणि पाकिटेही प्रसिद्ध केली. सोलापूर टपाल विभागाने तर एकाच वेळी सोलापूरची चादर, टॉवेल, मंगळवेढ्याची ज्वारी अशा तीन उत्पादनांची तिकिटे व पाकिटे समारंभपूर्वक प्रकाशित केली. केंद्रीय टपाल खात्याने आपल्या प्रत्येक विभागाला त्यांच्या कार्यक्षेत्रातील ‘जीआय’ उत्पादनाची अशी तिकिटे व पाकिटे प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे स्थानिक वैशिष्ट्ये टपाल तिकिटे व पाकिटांवर दिसतील.