शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित प्रवास देणारेच असुरक्षित

By admin | Updated: March 21, 2016 00:24 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली येथील वसाहत अनेक समस्यांनी घेरली आहे. ‘जे काही आहे, बरंच आहे’ अशी परिस्थिती आहे.

सांगवी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली येथील वसाहत अनेक समस्यांनी घेरली आहे. ‘जे काही आहे, बरंच आहे’ अशी परिस्थिती आहे. राज्यात सुरक्षित प्रवास देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मात्र राहण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ निवास उपलब्ध होऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. वसाहतीमध्ये नीट रस्ते नाहीत. कचरा टाकण्यासाठी कुंड्या नाहीत. रस्त्यावर कचरा साचला आहे. लहान मुलांसाठी असलेली खेळणी तुटून भंगार झाली आहेत, मोकाट जनावरांचा त्रास अशा विविध समस्यांनी ही वसाहत वेढलेली आहे. अशाच अवस्थेत येथे १२० कुटुंबे राहत आहेत. मुळातच वसाहत परिसरात मुख्य प्रवेशदार किंवा फाटक नसल्याने लगेचच घरांच्या रांगा सुरू होतात. १२० खोल्यांच्या या वसाहतीत दोन घरांच्या रांगांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त गवत वाढलेले आहे. तेथूनच सांडपाणी वाहत असल्याने परिसरात डासांचा उपद्रव आहे. संध्याकाळच्या वेळात घराबाहेर बसणेदेखील कठीण आहे.कॉलनीच्या कडेने सुरक्षा भिंत नसल्याने या ठिकाणी कुत्र्यांचा, तसेच डुकरांचा त्रास आहे. लहान मुलांना कुत्रा चावल्याच्या घटना अलीकडेच झाल्या आहेत. तरी देखील याभागात कुत्र्यांचा काहीही बंदोबस्त करण्यात आलेला नाही. भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळात धोकादायक ठरू शकते. वसाहतीला लागूनच असलेल्या भागात इतरही लोक कचरा टाकत असतात, त्यामुळे डुकरांचा वावर आहे. डुकरांमुळे कचरा पसरला जातो. संरक्षक भिंत नसल्याने या ठिकाणी वसाहतीमागील गावातील गाई वसाहतीत फिरत असतात. लहान मुलांना याचा गंभीर त्रास होऊ शकतो. तसेच ठिकठिकाणी शेण पडलेले असते. मोकळ्या जागेत वाढलेले गवत काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. वसाहतीतील घरे सुस्थितीत असली, तरी पक्क्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या वसाहतीत रस्त्यांचे डांबरीकरण नाही. तसेच काँक्रीटीकरण केलेले नाही. खडी व डांबर निघून गेल्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या किंवा घरगुती वापरासाठी पाण्याच्या समस्या नसल्या, तरी पावसाळ्यात अनेक घरे गळतात. भिंतीत पाणी पाझरत असल्याने घरात ओल राहते. वसाहतीसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. रखवालदार नाही. या ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी झाल्याच्या घटना आहेत. अलीकडेच १५ दिवसांपूर्वी एक-दीड लाखाची चोरी झाल्याची घटना आहे. काही वर्षांआधी वसाहतीला तारांचे कुंपण होते; परंतु वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेऊन रहिवाशांनी काही भागात स्वखर्चातून पत्रे बसवून घेतल्याचे समजले. दोन महिन्यांपूर्वी आमदार निधीतून जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. त्याचा वापर होत आहे. लहान मुलांसाठी मात्र या ठिकाणी बालोद्यानाची जागा असूनदेखील सोयी-सुविधांची वानवा आहे. या ठिकाणी बसविलेली खेळणी पूर्णत: गंजली असून, त्यांची अवस्था खराब आहे. घसरगुंडीवरील पत्रा गंजला असून, बऱ्याच ठिकाणी फाटलेला आहे. अशा घसरगुंडीवर खेळल्यास लहान मुलांना अपाय होऊ शकतो.