शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

साधू - साध्वींचे तीन दिवस भरगच्च कार्यक्रम

By admin | Updated: February 3, 2017 21:32 IST

जैन स्थानकवासी संघाचे प्रवर्तक कुंदनमुनीजी महाराज, युवाचार्य महेंद्रमुनीजी महाराज आदी 50 साधू - साध्वींचे आगमण झाले

ऑनलाइन लोकमत

चाकण, दि. 3 - जैन स्थानकवासी संघाचे प्रवर्तक कुंदनमुनीजी महाराज, युवाचार्य महेंद्रमुनीजी महाराज आदी 50 साधू - साध्वींचे आगमन झाले असून, तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महेंद्र मुनी महाराज यांच्या 36 व्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून युवक - युवती संमेलन, नवीन स्थानक भवनचे भूमिपूजन आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. युवक संमेलनासाठी मध्य प्रदेशचे आय.ए.एस. आधिकारी सुधीर कोचर हे आजच्या युवा पिढीकडून अपेक्षा व निश्चय याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत . उद्योजक रसिक लाल धाडीवाल, राष्ट्रीय युवा अध्यक्ष शशिकांत जैन, प्रांतीय युवा अध्यक्ष आदेश खिंवसरा, सागर सांकला आदी उपस्थित राहणार आहेत . महेंद्र मुनीजी महाराज यांचे चाकण हे जन्मगाव असून, पद स्वीकृतीनंतर ते प्रथमच चाकण येथे आले आहेत. ३६ वर्षांपूर्वी वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी दीक्षा ( संसारी जीवनाचा त्याग ) घेतली होती. युवाचार्य पद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मभूमी चाकण येथे आले आहेत .