शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एकमेका साहाय्य करू’च्या सूत्राने ग्रामीण भागात व्यापार

By admin | Updated: November 14, 2016 02:49 IST

‘एकमेका साहाय्य करू’च्या सूत्राने ग्रामीण भागात व्यापार

पवनानगर : कमी मूल्यांच्या नोटांचा तुटवडा, बँकांमधील नोटा बदलण्यासाठीची गर्दी व बाजारपेठेतील ग्राहकांची आडचण पाहत पवन मावळच्या ग्रामीण भागात ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ अशा पद्धतीने व्यापार सुरू झाला आहे.आपल्या नेहमीच्या ग्राहकाची अडचण न करता त्यांना आठवड्याच्या क्रेडिटवर माल देणे व्यापाऱ्यांनी सुुरू केले आहे. दूधवाले तर सध्या दररोजचे पैसे न घेता ग्राहकांना दुधाचा पुरवठा करत आहेत. भाजी विक्रेतेही पैशासाठी अडवणूक न करता विश्वासावर उधार देत आहेत. याबाबत काही व्यापारी सांगतात, ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकाने आठवडाभर जर अशा पद्धतीने व्यवहार चालवले, तर बँकांमधील गर्दी कमी होऊन बाजारपेठा सुरळीत चालतील. सामान्य नागरिकांचे हाल होणार नाही, याची सामाजिक भान ठेवून काम केल्यास काळ्या पैशाला चाप लावण्यास आपल्यासारख्या सामान्य माणसाची मदत होईल. बाजारपेठेतील व्यापारी व्यवसायातून जमा झालेले पैसे बँकांमध्ये जमा करत आहेत.पवन मावळमधील शिवणे, चांदखेड, बेबडओहळ, पवनानगर, जवण, कडधे या छोट्या बाजारपेठेत व्यापाराची गती वाढल्याचे जाणवत आहे. हॉटेल व्ययसायावर परिणाम झाला असून, बाजारपेठेतील जास्त रकमेची खरेदी थांबली आहे. मोठे व्यापारी दुकान बंद ठेवून सुटी घेत आहेत. रोजंदारीवरील छोट्या कामगार वर्गाचे हाल सुरूच आहेत. बँकांमधून चार हजार रुपयांपेक्षा जादा रक्कम मिळत नसल्याने व त्यात दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्याने या मजूर लोकांना २००० रुपयांचे सुटे मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)