शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘रुपी’च्या खातेदारांना मिळणार २० हजार

By admin | Updated: March 10, 2016 00:49 IST

येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे

सासवड : येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर, एका महिलेने पैसे देत नाहीत म्हणून कंटाळून विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने बँकेच्या व्यवस्थापनाची पळापळ झाली होती, तर याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्धा झाल्यानंतर खळबळ उडाली होती . त्यानंतर पैसे देण्याचे खात्रीशीर जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्णय घेऊन दि. ८ मार्च रोजी पुन्हा बँकेत ठिय्या मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज (दि. ८) पुन्हा तालुक्यातील खातेदार व ठेवीदार यांनी बँकेच्या व्यवस्थापनाकडे मागणे मांडले. तसेच, पैसे देण्याचे जाहीर केल्याशिवाय इथून हटणार नाही, असा निर्धार केला. मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्यासह रुपी बचाव पुणेकर नागरिक कृती समितीचे मिहिर थत्ते, दिलीप सातरीकर, सुधीर गोरीवले, तुकाराम कदम, पुरंदर कृती समितीचे अध्यक्ष संभाजी जगताप, खातेदारांनी बँकेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच, विविध प्रश्नांचा भडीमार केला. आम्ही बँकेत ठेवलेले पैसे आमच्या हक्काचे आहेत, आम्ही तुमच्याकडे कर्ज मागायला नाही आलो. तुम्ही कर्जदारांकडून वसुली करा, नाही तर नका करू, आम्हाला काही देणे-घेणे नाही, मात्र आमचे पैसे आम्हाला देऊन टाका. असा पवित्रा घेत आज पुन्हा खातेदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.मागील मिटिंग झाल्यानंतर बँकेने कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू केली आहे. केवळ आठ दिवसांत ७ लाख रुपये वसूल केल्याचे सांगितले. तसेच, मार्चअखेरपर्यंत आणखी ४० लाख रुपये वसूल करण्यात येतील. कर्जदारांचे न्यायालयात खटले सुरू असून, ते जलद निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. २०१३ मध्ये ९ कोटी रुपयांचे कर्ज होते, आता ते १ कोटी रुपयावर आले आहे. त्यामुळे ते लवकर वसूल करण्यात येतील. - व्ही. व्ही. बहुलेकर, शाखा अधिकारी, सासवड> अर्ज भरून घेणार : अभ्यंकर मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव यांनी बँकेचे प्रशासक अभ्यंकर यांच्याशी फोन वरून संपर्क साधला असता, त्यांनी एक एप्रिलपासून प्रत्येक खातेदाराला २० हजार रुपये देण्यात येतील, असे सांगितले. पुढील काळात ५० हजार रुपये मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरूअसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे याबाबत असे अर्ज उपलब्ध करण्यात आले असून, ठेवीदारांनी आपले अर्ज भरून द्यावेत आलेल्या एकूण अर्जांपैकी एका वेळेस १०० अर्ज भरून पाठविले जातील, तसेच त्यानंतर पुढील १०० अर्ज पाठविले जातील याप्रमाणे ठेवीदारांना पैशांचे वाटप केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.