शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दूधखरेदीच्या वरकड खर्चात रुपयाची कपात

By admin | Updated: September 1, 2014 05:26 IST

दूधखरेदीच्या वरकड खर्चात उद्यापासून (दि. १ सप्टेंबर) प्रतिलिटरमागे एक रुपयाची कपात करण्याचा निर्णय दूध प्रकल्पांनी घेतला आहे

इंदापूर : दूधखरेदीच्या वरकड खर्चात उद्यापासून (दि. १ सप्टेंबर) प्रतिलिटरमागे एक रुपयाची कपात करण्याचा निर्णय दूध प्रकल्पांनी घेतला आहे, अशी माहिती सोनाई दूध प्रकल्पाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिली.केंद्र शासनाने निर्यात होणाऱ्या स्किम मिल्क पावडरीकरिता मिळणारे पाच टक्के अनुदान बंद करण्याचा घेतलेला निर्णय, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपयांनी घसरलेले स्किम पावडरचे दर, यामुळे दूध प्रकल्पांना प्रतिलिटरमागे पाच ते सहा रुपये तूट सहन करावी लागत आहे.त्यामुळे नाइलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असे सांगून हीच परिस्थिती बाजारपेठेत कायम राहिली तर पुढच्या दहा ते पंधरा दिवसांत आणखी कपात होण्याची शक्यता आहे, असे माने यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, की ही परिस्थिती आणि मागणी अभावी अन्य दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात शिल्लक असणारे साठे यामुळे दूध प्रकल्प चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, अशी स्थिती झाली आहे. या बाबत विचार विनिमय करण्यासाठी पुण्यात राज्यातील दूध प्रकल्पांचे अध्यक्ष व अधिकारी वर्गाची बैठक घेण्यात आली.यावेळ निर्णय घेण्यात आला.बैठकीस पराग डेअरी मंचर, डायनामिक्स डेअरी बारामती, स्वराज इंडिया फलटण, सोनाई दूध प्रकल्प इंदापूर, गोविंद डेअरी फलटण, वैष्णवी डेअरी सोलापूर व पुणे, कात्रज डेअरी, महानंदा डेअरी, मळगंगा डेअरी या सह अन्य दूध प्रकल्पांचे अध्यक्ष, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)