शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

रम्बलर्सने वाढतेय धडधड

By admin | Updated: April 10, 2017 02:54 IST

स्थानिक नागरिकांच्या मागणीतून एका रात्रीत तयार होणाऱ्या रस्त्यांवरील रम्बलर्सची वाढती संख्या

 पुणे : स्थानिक नागरिकांच्या मागणीतून एका रात्रीत तयार होणाऱ्या रस्त्यांवरील रम्बलर्सची वाढती संख्या त्या रस्त्यांवरून रोज जाणा-येणाऱ्या वाहनचालकांच्या त्रासाचे कारण होत आहे. रम्बलर्स काढून टाकण्याची त्यांची मागणी, ते राहू द्यावेत यासाठी आग्रही असलेले स्थानिक नागरिक व त्यांच्या मागे असलेले माननीय यातून करायचे काय, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.दत्तवाडी परिसरातील गतिरोधकांच्या (सिमेंटचे तसेच नव्याने निघालेले प्लॅस्टिकचे) तसेच रम्बलर्स (रस्त्यापेक्षा अगदी थोड्या उंचीवर असणाऱ्या रंगांच्या सलग ५ ते ७ पट्ट्या) संख्येबद्दल सातत्याने  तक्रार करण्यात येते. या वाढत्या संख्येतील त्या भागातील घरांची रचना कारणीभूत आहे. रस्त्याला अगदी लागून घरे आहेत. लहान मुले, वृद्ध व्यक्ती घरातून बाहेर सातत्याने येत जात असतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांची त्यांना धडक बसू शकते. असे होऊ नये, वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी या भागातील नागरिकांकडून रम्बलर्स किंवा गतिरोधक बसवण्याची मागणी केली जाते. नगरसेवकांकडे झालेली ही मागणी मतदारांची असल्यामुळे त्वरित पूर्ण केली जाते. त्यामुळे या रस्त्यावर अगदी ५० फूट अंतरावरसुद्धा असे गतिरोधक किंवा रम्बलर्स बसवले गेले आहेत. ती त्या त्या भागाची गरज आहे, ती लक्षात घेऊनच महापालिका किंवा वाहतूक शाखेकडून बसवले जातात. त्यांची संख्या आता वाढल्यामुळे वाहनचालकांना त्या रस्त्यावरून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यातही दुचाकी वाहने तर खडखड करत पुढे जातात. त्यातून अनेकांना पाठीचे, मानेचे, कंबरेचे विकार जडले आहेत. रम्बलर्स रस्त्यावर लगेच दिसत नाहीत. त्यामुळे वाहनाचा वेग कमी झाला नसेल तर हा त्रास अधिकच वाढतो. कमी केला तर गाडीचे शॉक अ‍ॅब्झॉर्बर खराब होतात. अनेकांची वाहने नादुरुस्त होत आहेत.त्यामुळे वाहनचालकांकडून गतिरोधक काढून टाकावेत अशी मागणी सातत्याने होत असते. ते ऐकून महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी गेले की स्थानिक नागरिकांकडून त्यांना विरोध केला जातो. नगरसेवकांकडे तक्रार केली जाते. माननीय लगेच तिथे हजर होतात व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. अशा प्रकारांची संख्या वाढू लागल्यामुळे महापालिकेच्या पथ विभागातील अभियंते, वरिष्ठ अधिकारीही आता वैतागून गेले आहेत. त्यातूनच याविषयाचा विचार करण्यासाठी लवकरच वाहतूक शाखा, काही नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्या बैठकीचा विचार आहे. शहरांतर्गत असलेल्या रस्त्यांवर बहुसंख्य ठिकाणी अशीच स्थिती आहे. गेल्या काही वर्षांत तर नगरसेवक गतिरोधक, रम्बलर्स किंवा स्टिल पोलॉर्ड याकडे आपल्या प्रभाग विकास निधीतील खर्चाचा एक अत्यावश्यक भाग म्हणूनच पाहत आहेत. त्यामुळेच शहरातील बहुतेक रस्त्यांवर ते बसवले गेले आहेत. काही ठिकाणी तर रस्ता कमी व गतिरोधक जास्त अशी स्थिती झाली आहे. शहरातंर्गत रस्त्यांची अवस्था आधीच नाजूक असते. ते ठिकठिकाणी खोदून ठेवलेले असतात. त्यात आता गतिरोधकांची भर पडली आहे. त्यामुळे हे रस्ते म्हणजे अडथळ्यांची शर्यत झाले आहेत.कोणत्या रस्त्यावर किती गतिरोधक, रम्बलर्स असावेत, दोन गतिरोधकांमधील अंतर किती असावे याबाबत महापालिकेत काही धोरणच नाही. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे प्रकार, पादचाऱ्यांचा वापर असा बारकाईने विचार होण्याची यात गरज आहे, पण महापालिकेच्या ते गावीही नाही. इतकेच काय, पण वाहतूक शाखा व महापालिका यांच्यातच याबाबत कसला समन्वय नाही.स्थानिक नागरिक व त्या रस्त्याचा वापर करणारे वाहनचालक अशा दोन्ही बाजूंनी याबाबत तक्रारी येत आहेत हे खरे आहे. त्यामुळेच याबाबत आता विचार करावा लागणार आहे. सर्व घटकांशी संपर्क साधून यावर उपाययोजना केली जाईल.- राजेंद्र राऊत, मुख्य अभियंता, पथविभाग, महापालिका