शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीपात्रात खडखडाट!

By admin | Updated: March 30, 2017 00:26 IST

चासकमान धरण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमानदी कोरडी

दावडी: चासकमान धरण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमानदी कोरडी ठणठणीत पडली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच हा प्रश्न उद्भवला असून शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्यानेचासकमान धरणातून थोडे तरी पाणीसोडावे,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी, शिरोली, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातून भीमानदी वाहते. गेल्या दहा वर्षांत प्रथमच मार्च महिन्यात नदी कोरडी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. वीजपंप मोकळे पडले आहेत. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील बाजरी, भुईमूग तसेच तरकारी पिके घेतली आहेत. उन्हाचा तडाखा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे पिके जळून गेली आहेत. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतील पाण्यांनी तळ गाठला आहे. खरपुडी येथील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. मात्र या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती आहे. या गळतीमुळे रोज या बंधाऱ्यांतून लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे नदीपात्रात अडविलेल्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, त्यामुळे कृषिपंप मोकळे पडले आहेत. उन्हाळी पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. भीमा नदीत चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी मांजरेवाडी, पिंपळ, मलघेवाडी, शिरोली येथील शेतकऱ्यांनी केली आहे.चासकमान धरणात सध्या36.81% पाणीसाठा शिल्लक आहे. अजून एक ४० दिवसांचे डाव्या कालव्याला पाणीवाटप बैठकीत ठरल्यामुळे पाण्याचे आवर्तन बाकी आहे. मात्र पाणी कालव्याला कधी सोडणार, हे अद्याप निश्चित नाही.रब्बी पिकासाठी साडलेले पाण्याचे आवर्तन खेड व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची गरज नसतानाही दोन महिने डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे दरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. तेच पाण्याचे आवर्तन २५ दिवसांचे केले असते तर धरणात अजून जादा प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहून उन्हाळ्याचे दोन महिने या पाण्याचा उपयोग झाला असता. मात्र पाण्याचे वाटप नियोजन योग्य नाही, असे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शिरोली, मांजरेवाडी, पिंपळ, होलेवाडी या परिसरातील शेतकरी पाणी नसल्यामुळे अडचणीत, तसेच दावडी, निमगाव, खरपुडी, टाकळकरवाडी, जऊळके, मांडवळा या परिसरातील कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेली उन्हाळी पिके धोक्यात.