शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

शहरातील एटीएममध्ये पुन्हा खडखडाट

By admin | Updated: April 11, 2017 03:57 IST

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने; तसेच पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याने देशभरातील एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला होता़ लोकांच्या बँक खात्यात पैसे

पुणे : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने; तसेच पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याने देशभरातील एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला होता़ लोकांच्या बँक खात्यात पैसे असूनही त्यांना पैसे मिळू शकत नव्हते़ काहीशी अशीच परिस्थिती सध्या एटीएमबाबत शहरात दिसून येत आहे़ शहरातील बहुसंख्य खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला असून, असंख्य ठिकाणी नो कॅशचे बोर्ड लागले आहेत़ त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शहरातील मध्यवस्ती, महत्त्वाचे रस्ते, उपनगरांमधील बहुतेक एटीएममध्ये पैसे नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे नागरिकांची एका एटीएमपासून दुसऱ्या एटीएमकडे धावाधाव सुरू असल्याचे दिसून येत आहे़ ज्या ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे दिसून येत आहे़ शहरातील मध्यवस्तीबरोबरच उपनगरांमधील बहुसंख्य एटीएमवर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले दिसत आहेत़ ज्या काही मोजक्या ठिकाणी पैसे आहेत, त्या ठिकाणी केवळ २ हजार रुपयांच्या नोटाच उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे़कर्वे रोडवरील कर्वेपुतळा ते खंडोजी बाबा चौक दरम्यान किमान विविध बँकांचे १५हून अधिक एटीएम आहेत़ त्यापैकी केवळ नळस्टॉप येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे होते़ त्यातही केवळ २ हजार रुपयांच्या नोटा होत्या़ पौड फाटा, कर्वे रोडवरील पेट्रोल पंपाजवळील एटीएममध्ये तर सुरक्षारक्षकही दिसून आले नाही़ खासगी बँकांच्या जवळपास सर्व एटीएममध्ये ‘नो कॅश’चे बोर्ड लावलेले दिसून आले़ अनेक एटीएममध्ये लाइटही दिसून आली नाही, तर काही एटीएमचे शटरही बंद करून ठेवलेली आढळून आली़ शहरातील मध्यवस्तीतील नारायण पेठ, टिळक रोड या भागातील केवळ एक एटीएम सुरू असल्याचे दिसून आले़ जंगलीमहाराज रोड, कर्वेरोडवरील किमान वीसहून अधिक एटीएममध्ये पैसेच नसल्याचे दिसून आले़ याशिवाय हडपसर, गोखलेनगर, वारजे, मार्केटयार्ड परिसरातील एटीएम बंद असल्याचे दिसून आले़ अनेक ठिकाणी एटीएममध्ये लाइटही नाही़ काही ठिकाणी मशीन चालू असल्याचे दिसते़ पण, कार्ड टाकल्यानंतर ट्रॅन्झॅक्शन करायला सुरुवात केल्यानंतर, सर्वांत शेवटी मेसेज येतो की, नो कॅश.. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातोच, त्याचबरोबर मनस्तापही होत आहे़ नागरिकांनी डिजिटल व्यवहार करावेत, यासाठी जाणीवपूर्वक एटीएममध्ये पैसे भरले जात नसल्याचे बोलले जात आहे़ एटीएम; तसेच बँकांमधून किती वेळा पैसे काढायचे, यावर निर्बंध आणून त्यापुढे पैसे काढल्यास चार्ज लागू करण्यात आला आहे़ त्याचबरोबर पेट्रोलपंपावर कार्डद्वारे पेट्रोल भरल्यास चार्ज पडत आहे़ त्याबरोबर अनेक दुकानदारांनी आता कार्डद्वारे पेमेंट केल्यास, त्यावर २ टक्के चार्ज घेतला जाऊ लागला आहे़ त्यामुळे अनेकांनी आता कार्डद्वारे पेमेंट करणे बंद केले आहे़ (प्रतिनिधी)निर्बंध हटल्याने पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेएकावेळी एटीएममधून अधिक रक्कम काढली जाऊ लागली आहे़ त्याचवेळी अनेक एटीएममध्ये नवीन नोटा भराव्या लागत असल्याने व बँकांकडून एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपन्यांकडे पैसे पुरविले नसल्याचे सांगितले जात आहे़ खासगी बँकांचा ताण सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमधून खासगी, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना सारख्याच प्रमाणात नोटा मिळत आहेत़ नोटांचा तुटवडा नाही़ लोकांनी डिजिटल व्यवहाराकडे वळावे, यासाठी खासगी बँकांनी आपल्या एटीएममधील नोटा भरणा करण्याचे प्रमाण कमी केल्याने त्यांची एटीएम रिकामी झाली आहेत़ त्याचा ताण सरकारी बँका व त्यानंतर सहकारी बँकांच्या एटीएमवर आला आहे़ एटीएममधून किती पैसे काढायचे, यावरील निर्बंध दूर केल्याने; तसेच व्यवहारावर चार्जेस लावण्यात आल्याने नागरिक जरुरीपेक्षा अधिक पैसे काढत असल्यानेही हा एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला असावा़ विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को़ आॅप बँक फेडरेशन