शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसच मोडतात नियम

By admin | Updated: July 6, 2017 03:03 IST

एखादा वाहनचालक नियम थोडाही नियम चुकला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. मात्र

लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : एखादा वाहनचालक नियम थोडाही नियम चुकला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. मात्र वाहतूक पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. सध्या रहाटणी फाटा,शिवार चौक,काळेवाडी फाटा, तापकीर चौक या परिसरात सांगवी वाहतूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे . शिवार चौकात तर मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. त्या वेळी एक अधिकारी, चार पोलीस कर्मचारी व दोन वाहतूक वॉर्डन या वेळी कारवाईत सहभागी झाले होते. मात्र शिवार चौकातून साई चौकाकडे जाणाऱ्या धावत्या वाहनांना वाहतूक पोलीस व वॉर्डन अडवीत होते. यात एखादा चालक अपघातग्रस्त झाला, तर जबाबदार कोण, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत. काळेवाडी फाट्यावर तर पोलिसांकडून सर्रास वाहने अडविली जातात. याला कोणत्याही वाहनचालकाचा आक्षेप नाही. मात्र या ना त्या कारणाने वाहन अडवून दंड आकारण्याला वाहनचालकांचा विरोध आहे. एखाद्या वाहनचालकाने झेब्रा क्रॉसिंग केले, तर त्याला दंड आकारला जातो. मात्र, वाहतूक पोलिसाने झेब्रा क्रॉसिंग केले, तर त्याला दंड कोण करणार? कुंपणच शेत खात असेल, तर त्याला काय म्हणायचे, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.वॉर्डनच करतात ई-चलन सध्या ई चलनप्रणाली वाहतूक पोलिसांनी अवलंबली असल्याने रोख व्यवहारावर बंधने आली आहेत. या यंत्रणेत वाहनाचा क्रमांक टाकला की, संबंधित चालकाने किती वेळा नियमाचे उल्लंघन केले व किती वेळा त्याला दंड झाला हे दिसून येते. ही यंत्रणा वाहतूक पोलिसांनीच हाताळावी लागते. मात्र, सांगवी वाहतूक विभागात अनेक वेळा वॉर्डनच ई-चलन करताना दिसतात. तसेच वाहन अडविणे, परवाना तपासणे, पेपर तपासणे ही कामे वॉर्डनच करीत आहेत. त्यामुळे हे वॉर्डन वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत, की पावत्या करण्यासाठी, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. पोलिसांकडूनच होतेयनियमांची पायमल्लीशहर परिसरात अनेक ठिकाणी पोलिसांकडूनच नियमांचे उल्लंघन होत आहे. येथील अनेक चौकांत वाहतूक पोलीस आणि खाकी वर्दीतील पोलीस बिनधास्तपणे ट्रिपलसिट गाड्या चालवित असतात. तसेच हेल्मेटही वापरत नाहीत. नियम मोडल्यास पावती फाडण्यास कधी न चुकणारे पोलीस नियम कधी पाळणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हाही प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.