शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या राजकीय जाळ्यात सापडले सत्ताधारी

By admin | Updated: June 29, 2017 03:43 IST

विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा म्हणून टिकास्त्र सोडले व त्यात सत्ताधारी अगदी अलगद सापडले. त्यामुळेच सहज सुटू शकणारा विषय त्यांच्यासाठी आता जटील झाला असून तो सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे महापालिकेत बोलले जात आहे.पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ऐन शाळा सुरू व्हायच्या वेळेस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचे दर प्रतिकिलोमीटर ६१ रुपयांवरून १४१ रुपये केले. त्याची पूर्वकल्पना शाळांना, संचालक मंडळाला दिलीच नाही. एकूण ६७ बस या प्रकारे सुरू होत्या. त्यातील ११ शाळांच्या १७ बस वगळता अन्य शाळांनी वाढीव दराने बस घेतल्या. काही शाळा महापालिकेच्या होत्या, त्या विनामूल्यच असल्याने त्याही सुरूच राहिल्या. प्रश्न फक्त ११ शाळांच्या १७ बसचाच शिल्लक राहिला आहे, असे पीएमपीमधील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यातही पीएमपीएलच्या वतीने सर्वच शालेय विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के सवलतीच्या दरात पास दिला जातो. हे ७५ टक्के महापालिका पीएमपीला देत असते. तरीही काही खासगी शाळांनी आमचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे आम्हाला खास बस हवी, अशी मागणी केली होती. ती महापालिकेने मान्य केली. एका बसमध्ये किमान ४५ विद्यार्थी असतील तर ती बस पीएमपीएलला परवडते, मात्र गेल्या वर्षभरात एका बसमध्ये फक्त २० ते २५ किंवा फारतर २८ विद्यार्थीच येऊ लागले. त्यामुळे ती बस पीएमपीला परवडेनाशी झाली. त्यातूनच मुंढे यांनी दरवाढीचा निर्णय घेतला, असे अधिकारी सांगतात. दरम्यानच्या काळात डिझेल व सुटे भाग महागल्यामुळे प्रतिकिलोमीटर दरही ६१ रुपयांहून ८१ रुपये करण्यात आला होता व त्याप्रमाणेच आकारणी सुरू होती. आता पुन्हा तोटा वाढू लागल्यानंतर मुंढे यांनी ही दरवाढ केली. सर्वच शालेय विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ७५ टक्के सवलत दिली जात असताना व ते पैसे महापालिका अदा करत असताना पुन्हा खास बस कशासाठी या विचाराने त्यांनी नव्याने झालेल्या या दरवाढीबाबत काही शाळांनी दरवाढीबाबत ओरडा सुरू केल्यानंतर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे यांनी सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी म्हणून दरवाढीचा विषय लावून धरला, त्यामुळे भाजपाला यावर हालचाल करणे भाग पडले व ते त्यातून ते अडचणीत आले आहेत, असेच दिसते आहे.