शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओला वर्षभरात १२९० कोटी

By admin | Updated: April 2, 2016 03:38 IST

वाहन नोंदणीत सुरू असलेली वाढ, नियमभंग वाहनचालकांकडून आकारण्यात येणारा दंड, विविध प्रकारचे कर, आकर्षक क्रमांक लिलाव, पर्यावरण करासह इतर वेगवेगळ्या स्वरूपात मिळणाऱ्या

पुणे : वाहन नोंदणीत सुरू असलेली वाढ, नियमभंग वाहनचालकांकडून आकारण्यात येणारा दंड, विविध प्रकारचे कर, आकर्षक क्रमांक लिलाव, पर्यावरण करासह इतर वेगवेगळ्या स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे २०१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल १२९० कोटी ४३ लाखांचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी हेच उत्पन्न सुमारे ११५७ कोटी ३६ लाख रुपये होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २४८ कोटींनी वाढ झाली आहे. एकट्या पुणे कार्यालयाच्या उत्पन्नात सुमारे १३० कोटींची वाढ झाली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. आरटीओ कार्यालयामार्फत वाहनचालकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या माध्यमातून पार पडलेल्या आर्थिक वर्षात १२५५ कोटी १२ लाखांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महसूल पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर आणि अकलूज या उपप्रादेशिक आरटीओ कार्यालयातून जमा झाला असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. वर्षभरात पुणे शहरात ६८० कोटी ९८ लाखांचा महसूल गोळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड कार्यालयात ३९८ कोटी ४६ लाखांचा महसूल, बारामती कार्यालयात ५९ कोटी ७० लाख, सोलापूर कार्यालयात ११३ कोटी ४९ लाख आणि अकलूज कार्यालयात ३६७ कोटी ८ लाखांचा महसूल जमा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वर्षभर विविध योजना तसेच सक्षमपणे कारवाई होत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली, तरी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाजाचे नियोजन केले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगले उत्पन्न मिळाले. - जितेंद्र पाटील (प्रादेशिक परिवहन अधिकारी)