शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कवाढीविरोधात आरटीओत आंदोलन

By admin | Updated: January 11, 2017 02:43 IST

पूर्वकल्पना न देता केंद्र सरकारने मोटार वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.

पिंपरी : पूर्वकल्पना न देता केंद्र सरकारने मोटार वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ न्यू पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने मंगळवारी दुपारी मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर संघटनेने परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यामध्ये नंदकुमार चव्हाण, संतोष चुंबळकर, कार्याध्यक्ष अकबर शेख, सचिव स्वप्निल पवार, सहसचिव नारायण सव्वासे, खजिनदार सुनील बर्गे, चंद्रशेखर परदेशी, अरुण शहा, प्रकाश मुरकुटे, अकबर शेख, दत्ता मोरे, दिनेश तट्टू, गणेश ढेरे,समीर शेख, अरविंद इंदलकर, झाकीर शेख, संदीप देसाई, अशोक मालवाड सहभागी झाले होते.आरटीओ कार्यालयांना आणि नागरिकांना शुल्कवाढीबाबतची पूर्वकल्पना मिळणे अपेक्षित होते. मात्र शासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.शिकाऊ वाहन परवाना शुल्क पूर्वी ३१ रुपये होते. सुधारित शुल्करचनेनुसार शिकाऊ परवान्यासाठी आता १५० रुपये मोजावे लागणार आहेत. स्मार्ट कार्ड नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्रासाठी २०० रुपये जादा शुल्क असणार आहे. २९ डिसेंबरपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे २९ डिसेंबरपूर्वी वाहन परवान्यासाठी अर्ज केलेल्या ग्राहकांकडून अधिकचे पैसे घेतले जाणार आहेत. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. (प्रतिनिधी)