पुणो : नुकतीच सुरू करण्यात आलेली ‘ऑनलाइन परवाना सिस्टीम’ मंगळवारी दुपारी कोलमडून पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रस सहन करावा लागला. आरटीओच्या या कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी दुपारी गोंधळ घातल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
शिकाऊ परवाना काढण्यासाठी ऑनलाइन लर्निग लायसन्स सिस्टीम सुरू करण्यात आली होती. परंतु, सव्र्हर हँग होणो, संकेतस्थळ न उघडणो- अशा तांत्रिक बिघाडांमुळे नेहमीच सिस्टीम बंद पडत होती. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या सिस्टीम सुरू असल्याचे आरटीओकडून सांगण्यात येत होते; परंतु मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही सिस्टीम पुन्हा कोलमडली. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी जमलेल्या जवळपास चारशे नागरिकांना ही सिस्टीम सुरू होईर्पयत ताटकळत बसावे लागले.
ही बाब लक्षात यायलाही अधिका:यांना बराच वेळ लागला. त्रस्त झालेले 4क्क् नागरिक अधिका:यांना भेटायला येणार म्हटल्यावर, अधिका:यांनी तातडीने ‘म्यॅन्युअली’ परीक्षेला सुरुवात केली. पर्यायी व्यवस्था करून ‘मौखिक चाचणी’ घ्यायला सुरुवात करण्यात आली. ही सिस्टीम साधारणपणो साडेतीनच्या सुमारास पुन्हा सुरू झाली, तेव्हा मौखिक चाचणी आणि ऑनलाइन अशी दोन्ही प्रकारे ेनागरिकांची चाचणी घेण्यात येत होती. (प्रतिनिधी)
ऑनलाइन परवानासेवेसाठी हैदराबाद येथील एनआयसीची टीम काम करते. त्यांच्या सिस्टीममधील बिघाडाबाबत माहिती दिल्यावर, त्यांनी तातडीने दुरुस्ती करून ही सेवा पूर्ववत केली. ‘सॉफ्टवेअर’मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, गोंधळ निर्माण झाला होता; परंतु दुपारी ही सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
- जितेंद्र पाटील, मुख्य परिवहन अधिकारी, पुणो.