शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘महा-ई-सेवा’ केंद्रातून आता आरटीओचे अर्ज

By admin | Updated: February 2, 2017 04:02 IST

परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या मध्यस्थांचा (एजंट) उपद्रव थांबविण्यासाठी परिवहन विभागाचे अर्ज महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून लवकरच सुरू करण्याचा

पुणे : परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या मध्यस्थांचा (एजंट) उपद्रव थांबविण्यासाठी परिवहन विभागाचे अर्ज महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनीच ही माहिती दिली.परिवहन आयुक्त गेडाम यांनी बुधवारी परिवहन कार्यालयाची झाडाझडती घेतली. यामध्ये नागरिक, संघटना तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिवहन कार्यालयातील कामकाजात सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी त्यांनी काही सूचनाही केल्या. परिवहन आयुक्तांनी सुमारे दीड तास परिवहन कार्यालयातील सर्वच विभागांची माहिती घेतली. दरम्यान, आॅनलाइन पद्धतीने भरण्यात येणारे अर्ज किचकट असल्याने सर्वसामान्य नागरिकांना एजंटांकडे धाव घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेऊन परिवहन विभागातील अर्ज राज्यातील महा-ई-सेवा केंद्रातून भरता येतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे गेडाम यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना आॅनलाइन अर्ज भरताना अनेकदा अडचणी जाणवतात. यामुळे त्यांना मध्यस्तांकडे धाव घ्यावी लागते. सर्वसामान्य नागरिक दलालांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आरटीओचे सर्व अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना अर्ज शुल्काव्यतिरिक्त एका अर्जासाठी २० रुपये सेवा शुल्क द्यावे लागेल. सुरुवातीस दहा प्रकारचे अर्जच अशा पद्धतीने भरता येतील. त्यानंतर जवळपास सर्वच प्रकारचे अर्ज भरण्याची सोय उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर परिवहन आयुक्तांनी संगम ब्रीज येथील कार्यालयाला भेट देत, येथील कार्यालयातील शिकाऊ परवाना विभागासह इतर सर्व विभागांची पाहणी केली. कामकाजासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणीसंदर्भात विचारणा केली. सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा भाषेत कामकाजासंदर्भातील बोर्ड लावण्याची सूचनादेखील त्यांनी केली. विविध संघटनांच्या सदस्यांनी परिवहन शुल्कातील वाढ मागे घेण्यासंदर्भात मागणी केली. संघटनांची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली असल्याचे गेडाम यांनी सांगितले.आॅनलाइन प्रणाली लवकरच निर्दोषआॅनलाइन कामकाजासंदर्भात अजूनही मोठ्या प्रमाणात अडचणी जाणवत आहेत. नव्याने दाखल झालेल्या ४.० प्रणालीमध्येही दोष आहेत. हे दोष दूर करण्यासाठी एनआयसीच्या मुख्य कार्यालयाला कळवण्यात आले आहे. यामुळे आॅनलाइन प्रणालीतील दोष लवकरच दूर होतील, असे आश्वासनही परिवहन आयुक्तांनी दिले.