शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

पालिकेला दर वर्षी १५० कोटींचा ‘शॉक’

By admin | Updated: May 8, 2015 05:32 IST

नागरिकांना सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यास मिळकतकरात ५ टक्के सवलत देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पुणे महापालिकेस मात्र सौरऊर्जेचे वावडे आहे.

सुनील राऊत, पुणेनागरिकांना सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यास मिळकतकरात ५ टक्के सवलत देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पुणे महापालिकेस मात्र सौरऊर्जेचे वावडे आहे. त्यामुळे महापालिकेचा दर वर्षीचा वीजखर्च तब्बल १५० कोटींच्या घरात पोहोचला आहे. महापालिकेने दर वर्षी काही प्रमाणात का होईना पण सौरऊर्जा यंत्रणा वापरण्यास सुरुवात केल्यास नागरिकांनी कराच्या रूपाने भरलेला निधी वीजबिलावर खर्च न होता तो विकासकामांसाठी वापरता येणे शक्य आहे. मात्र, प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्याअंतर्गत पाणीपुरवठा, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प, तसेच पथदिवे आणि इतर प्रकल्पांसाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणावर विजेची गरज भासते. महावितरणने सवलतीच्या दरात वीज दिली असली, तरी त्याचा मोठा बोजा महापालिकेच्या अंदाजपत्रकावर येत असून, वीजबिल आणि देखभालीसाठी पालिकेस दर वर्षी अंदाजपत्रकातील ४ ते ५ टक्के निधी खर्च करावा लागत आहे. दर वर्षी महावितरणकडून वीजबिलात दरवाढ केली जात असल्याने हा खर्च गेल्या पाच वर्षांत २०० कोटींच्या घरात पोहोचला आहे. सर्वाधिक खर्च पाणी शुद्धीकरण आणि वितरणासाठी ९५ ते १०० कोटी, पथदिवे व पालिकेच्या कार्यालयासाठी ५० कोटी, तर जलशुद्धीकरण केंद्रासाठी १५ ते १७ कोटींच्या घरात पोहोचला आहे. एकीकडे देशातील आठवे महानगर म्हणून वेगाने विकसित होणारे शहर म्हणून बिरूदावली मिरविताना, इतर सात शहरांच्या तुलनेत पुणे महापालिका सौरऊर्जा वापरण्याच्या स्पर्धेतही नसल्याचे दिसून येते.