शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आडव्या बाटलीसाठी होणार फेरमतदान

By admin | Updated: February 3, 2016 01:40 IST

बाटली उभी रहावी म्हणून कितीही आटापिटा केला तरीही महिला शक्तीपुढे अखेर नमावे लागले आहे. महिलांच्या निर्धारामुळे निघोज गावातील दारुबंदीसाठीचे मतदान पुन्हा नव्याने घेण्याचे

टाकळीहाजी : बाटली उभी रहावी म्हणून कितीही आटापिटा केला तरीही महिला शक्तीपुढे अखेर नमावे लागले आहे. महिलांच्या निर्धारामुळे निघोज गावातील दारुबंदीसाठीचे मतदान पुन्हा नव्याने घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. निघोज (ता. पारनेर) येथील दारूबंदी महिला चळवळीने गावात बाटली आडवी करण्यासाठी लढा उभारला. मात्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतील गोंधळामुळे मात्र या महिलांना तांत्रिक कारणास्तव पराभवाला सामोरे जावे लागले होते. तरीही हार न मानता त्यांनी दारुबंदीच्या विरोधात पुन्हा कंबर कसली आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे ज्येष्ठ नेते अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने महिलांच्या निर्धाराला मोठे पाठबळ लाभले. अण्णा हजारे यांच्यासह पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार विजय औटी यांनीही या प्रकरणी लक्ष घातले. आडव्या बाटलीसाठी फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आल्याने दारूधंदावाले व त्यामध्ये गडबड घोटाळा करणारे अधिकारी मात्र हादरले आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या सोमवारच्या बैठकीत यावर आमदार विजय औटी यांनी शिंदे व प्रशासनाचे लक्ष वेधून निघोजचे महिलांचे आंदोलन व संबंधित खात्याची भूमिका, यावर चर्चा घडवून आणली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याची सविस्तर चौकशी करून फेरमतदान घेण्याचे आदेश दिले. आठ दिवसांपूर्वी दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले; मात्र उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांनी निकाल यंत्रणा फिरविली असल्याचा महिलांचा आक्षेप होता. त्यामुळे अवघ्या ७० मतांनी दारूबंदी फेटाळली गेली. चार हजार महिलांचे मतदान असणाऱ्या गांवामध्ये मतदानासाठी २,५०० महिला आल्या होत्या; मात्र मतदार यादीत नावच नाही, ओळखपत्र नाही, अशी कारणे पुढे करून उत्पादनशुल्क खात्याने अनेक महिलांना मतदान प्रक्रियेत भाग घेऊ दिला नव्हता. ५०० महिलांना मतदानात भाग न घेता परत जावे लागले. मतदान झालेल्या दोन हजार मतदानातसुद्धा बाद मतांचे प्रमाण सर्वाधिक होते. ‘हा पराभव केवळ या भ्रष्ट यंत्रणेने केला असून, आम्हाला न्याय न दिल्यास कायदाच हातात घेऊ; मग आम्हाला तुरुंगात टाका किंवा फासावर चढवा,’ असा निर्वाणीचा इशारा देत महिला संघटनेने जोरदार आंदोलन केल.