शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’साठी रस्सीखेच

By admin | Updated: March 27, 2017 03:09 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने पाचपैकी तीन जागा मिळणार आहेत. स्वीकृत नगरसेवकपदाची संधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने पाचपैकी तीन जागा मिळणार आहेत. स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळावी यासाठी भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांत रस्सीखेच आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ७७, राष्ट्रवादी काँग्रेसला ३६, शिवसेना ९, अपक्षांना ५, मनसेला १ जागा मिळाली. एकूण १२८ जागा आहेत. त्यामुळे पाच स्वीकृत सदस्यांची निवड करता येते. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार त्यांना तीन जागा मिळणार आहेत. तर उर्वरित दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षास अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार आहे. एप्रिल महिन्यातील सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. शहर भाजपात जुन्या-नव्यांचा वाद, गडकरी आणि मुंडे असे दोन गट आहेत. गेल्या वर्षभरापासून नवीन नेते पक्षात आले आहेत. त्यामुळे निष्ठावान आणि आयाराम असा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीनंतर महापौर नितीन काळजे यांची महापौरपदी निवडीच्या वेळीही वाद उफाळून आला आहे. नितीन गडकरी गटाचे आणि जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ पवार यांना सत्तारूढ पक्षनेतेपद दिले. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदी मुंडे गटाच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची मागणी आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी, सारंग कामतेकर, अमोल थोरात, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, सरचिटणीस बाबू नायर, राजेश पिल्ले, सूरज बाबर, निहाल पानसरे यांच्या नावाची चर्चा आहे. स्वीकृत सदस्यपद आयारामांना देऊ नये, अशी मागणी ज्येष्ठांनी केली आहे. शहर पदाधिकाऱ्यांत एकमत नसल्याने निवडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे.(प्रतिनिधी)अपक्षांचा स्वतंत्र गट : शिवसेनेला नाही एकही जागा राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडले जाणार आहेत. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, विजय गावडे, संजय वाबळे, उल्हास शेट्टी, जालिंदर शिंदे, तानाजी खाडे यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांच्यासाठी राष्ट्रवादीची एक जागा कमी करून अपक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न होता. मात्र, ऐनवेळी अपक्षांनी स्वतंत्र गटांची नोंदणी केली. त्यामुळे शिवसेनेला एक जागा मिळण्याचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही.