शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना आत्मानंद देणारा ‘रुपेरी कडा’

By admin | Updated: March 1, 2016 01:00 IST

‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण खोटी ठरविण्याचा प्रयत्न प्राधिकरणातील ‘रुपेरी कडा कला मंचा’च्या वतीने केला जात आहे. विविध कलांची जोपासना करून स्वानंदाबरोबरच ज्येष्ठ सहकाऱ्यांना

शरद इंगळे,  पिंपरी‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण खोटी ठरविण्याचा प्रयत्न प्राधिकरणातील ‘रुपेरी कडा कला मंचा’च्या वतीने केला जात आहे. विविध कलांची जोपासना करून स्वानंदाबरोबरच ज्येष्ठ सहकाऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. शहरीकरणात एकत्रित कुटुंबपद्धती दुरापास्त होऊ लागली आहे. त्यामुळे निवृत्तीच्या कालखंडात ज्येष्ठांनी करायचे काय, असा प्रश्न आहे. शहरात प्रामुख्याने ही समस्या अधिक तीव्रतेने भेडसावते. मुले-मुली नोकरीला जातात. नातवंडेही शाळेत गेल्यानंतर वेळ घालवायचा कसा, असा प्रश्न ज्येष्ठांसमोर उभा राहतो. त्याचे उत्तर शोधण्यातून निगडी प्राधिकरणात ‘रुपेरी कडा कला मंच’ अस्तित्वात आला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा, त्यास व्यासपीठ मिळवून द्यावे. त्यातून आनंददायी आयुष्य जगता यावे, या हेतूने पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण भागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी एकत्रित येऊन २००१मध्ये कला मंचाची स्थापना केली. मंचाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. तसेच सकारात्मक जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन केले जाते. दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विविध सामाजिक, प्रबोधनपर, संवेदनशील विषयांवर नाटक स्वत: ज्येष्ठ सभासद तयार करून सादर करतात. अभिनय, साहित्य, नृत्य, गाणी असे विभाग मंचातर्फे करण्यात आले आहेत. सामाजिक विषय घेऊन जनजागृतीसाठी पुढाकार घेतला जातो. या मंचाने भ्रूणहत्येवर ‘लेक वाचवा’, एडसबाबत जनजागृती, प्रबोधन केले.