शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

मरकळला दरोडेखोरांचा धुडगूस

By admin | Updated: October 16, 2015 01:19 IST

चड्डी व बनियान घातलेल्या सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने मरकळ (ता. खेड) येथील बाजारेवस्तीवर आज (गुरुवार) मध्यरात्रीच्या सुमारास धुडगूस घातला

शेलपिंपळगाव/ आळंदी : चड्डी व बनियान घातलेल्या सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने मरकळ (ता. खेड) येथील बाजारेवस्तीवर आज (गुरुवार) मध्यरात्रीच्या सुमारास धुडगूस घातला. दहशतीचा वापर करून सुमारे सत्तर हजार रुपयांचा ऐवज लुटला. या टोळीला प्रतिकार करणाऱ्या बाप-लेकाला त्यांनी बेदम मारहाण केली असून, त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, दरोडेखोर चड्डी-बनियान गॅँगचे असल्याचे भासविण्याचा प्रयत्न या टोळीने केला असल्याचा दावा आळंदी पोलिसांनी केला आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आळंदी-मरकळ रस्त्यावरील बाजारे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास घडली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याला लागून असलेल्या येथील वस्तीवरील शांताराम लोखंडे यांच्या घरावर दगडफेक करत प्रथम हल्ला केला. घराबाहेरील अंगणात झोपलेल्या शांताराम लोखंडे व त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्याला त्यांनी काठ्यांनी जबर मारहाण करीत घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळविला. बाहेरील आरडाओरड्याने घरातील नवनाथ शांताराम लोखंडे (वय ३०) यांनी या टोळक्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही काठ्यांनी जबर मारहाण करून घरातील कपाटामधील रोख नऊ हजार रुपये, मंगळसूत्र, पायातील पैंजण, राणी हार अशा मौल्यवान वस्तू, असा अंदाजे सत्तर हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या बाप-लेकांना प्राथमिक उपचारासाठी तत्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मारहाणीत नवनाथ शांताराम लोखंडे यांना दुखापत झाली असून, त्यांच्या वडिलांनाही किरकोळ जखम झाली आहे. या घटनेची माहिती आळंदी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजयकुमार पाटील आदींनी भेट दिली. श्वानपथक व अंगुली मुद्रातज्ज्ञ पथकाद्वारे घटनेची पाहणी करण्यात आली आहे. अज्ञात सात ते आठ जणांच्या टोळक्यावर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिसांची विशेष चार पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेची फिर्याद दीपाली लोखंडे यांनी आळंदी पोलिसांना दिली. (वार्ताहर)