शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राचे छत कोसळले

By admin | Updated: January 14, 2016 03:50 IST

बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छत कोसळून दोन रुग्ण गंभीर जखमी झाले. बुधवारी (दि. १३) दुपारी ही दुर्घटना घडली.

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छत कोसळून दोन रुग्ण गंभीर जखमी झाले. बुधवारी (दि. १३) दुपारी ही दुर्घटना घडली. गजानन गणपत भापकर (वय ४८, रा. लोणीभापकर) व मुढाळे येथील मजूर महिला विमल गुलाब बाबर (वय ५५ ,रा. मुढाळे) हे गंभीर जखमी झाले.चौदा वर्षांपूर्वी बांधकाम, तर सात वर्षांपूर्वी दुरुस्ती केलेल्या या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची सतत चर्चा होत राहिली. परंतु, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे काणाडोळा करण्याची भूमिका घेतली. आज रुग्णांच्या जिवावर बेतण्याचा प्रसंग उद्भवल्याने ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तालुक्याच्या जिरायती भागातील लोणीभापकर ते कऱ्हावागज या मोठ्या पट्ट्यातील लोकसंख्येसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्यसेवा पुरविली जाते. सन २००२ मध्ये या केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासूनच येथील बांधकामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थ तक्रारी करीत आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्याची खंत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. जखमींना तातडीने बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकारानंतर सध्या इमारतीच्या छताचे लोखंड उघडे पडल्याचे जागोजागी दिसत आहे. अनेक ठिकाणी छताचा भाग खाली आल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र आहे. येथील सेवा उघड्यावर पडल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)