शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची भूमिका आज ठरणार

By admin | Updated: February 21, 2015 22:38 IST

कॉंम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी उपोषण सुरू आहे.

पुणे : कॉंम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी उपोषण सुरू आहे. आंदोलन तीव्र करण्याबाबत रविवारी (दि. २२) भूमिका ठरविण्यासंदर्भात शहरातील पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, उपोषणाला बसलेल्या तरुणांची शनिवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये अश्विनी सातव-डोके व हर्षल लोहकरे या दोघांची प्रकृती खालावल्याचे आढळले आहे. ‘किटोन'चे प्रमाण वाढल्याने उपोषणाचा कालावधी वाढल्यास या दोघांची किडनी निकामी होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. १६ फेब्रुवारीला कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला होता. पाच दिवस मृत्यूशी झुंज देत शुक्रवारी पानसरे यांची प्राणज्योत मालवली. १७ फेब्रुवारीपासून राजन दांडेकर, हनुमंत पवार, अश्विनी सातव-डोके व हर्षल लोहकरे या चार जणांनी उपोषण सुरू केले आहे.पानसरे व दाभोलकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करावी, तसेच हल्ल्यामागे असणाऱ्या शक्तीचा शोध घ्यावा, आदी मागण्यांसाठी पाच दिवसांपासून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर बेमुदत उपोषण सुरू आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणारडॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांना तातडीने पकडावे, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी. मारेकऱ्यांसह यामागे असणारा मास्टर माईंडचा शोध घ्यावा. ज्या प्रतिगामी शक्ती यामागे असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, आदी मागण्या या पत्रातून करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आंदोलकांसह कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविणार आहेत. शनिवारी प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून आमच्या आंदोलनाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठा आहे. तरुण कार्यकर्ते पथनाट्य, गीते यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून आंदोलन करताना दहा हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते. पानसरे अण्णांच्या हत्येबद्दल प्रचंड संताप आहे. आज दिवसभर आम्ही याबद्दल मौन बाळगले होते. - राजन दांडेकर, उपोषणकर्ते