शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

बहुतेक एटीएममध्ये खडखडाटच

By admin | Updated: May 8, 2017 03:17 IST

सहा महिन्यांपूर्वी एक हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यापासून अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : सहा महिन्यांपूर्वी एक हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यापासून अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक वेळा एटीएममधून पैसे मिळेनासे झाले आहेत. एटीएममधून आवश्यकतेनुसार पैसे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.धनकवडी, दत्तनगर, आंबेगाव पठार, बालाजीनगर या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत केलेल्या पाहणीमध्ये सर्वच बँकांच्या २३ एटीएमपैकी केवळ एकाच बँकेच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती. सध्या यात्रा, उरुस, लग्नसराई असल्याने जवळ पैसे आवश्यक असताना एटीएममधून तो  मिळत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.  भारती विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने मुलांनी नाराजी व्यक्त केली. पैसे काढण्यासाठी एटीएमचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.  पैसे काढणाऱ्यांची संख्या  जास्त असल्याने कॅश लवकर संपत आहे. पैशासाठी पायपीटआंबेगाव बुद्रुक : येथील अनेक एटीएममध्ये कॅश नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खात्यात पैसे असतानाही एटीएममधून ते मिळत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आंबेगाव पठार येथील सहा एटीएमपैकी दोन ते तीन एटीएममध्येच पैसे उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. साई सिद्धी चौकातील एटीएममध्ये दुपारपासून पैसे संपल्याने नागरिकांना एटीएम शोधून पैसे काढण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.हाल कमी होईनाहडपसर : मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाले, शासनाने आॅनलाइन व्यवहारासाठी अनेक योजना व बक्षिसे जाहीर केली. नागरिकांचे खिसे खाली झाले. मात्र एटीएम व आॅनलाइन व्यवहार नागरिकांसाठी अजूनही सुकर झाले नाहीत. अनेक एटीएम सुरू; पण कॅश नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ६ महिने उलटूनही ही अवस्था असेल तर ही परिस्थिती नेमकी कधी बदलणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे. स्वाइप मशिनवरही मोठ्या प्रमाणात कर लावला जात असल्याने त्रासात अधिक भर पडली आहे. नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे.ज्येष्ठ नागरिकांचे होताहेत हालसहकारनगर : सहकारनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पेन्शनर्स राहतात. त्यांची राष्ट्रीयीकृत बँकेत खाती आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय बँकेची संख्याही मोठी आहे. मात्र नोटाबंदी होऊन सहा महिने लोटले तरी पैशाचा अभावच आहे. अनेक एटीएममध्ये पुरेशी कॅश नसल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्या ठिकाणी पैसे आहेत, तेथे मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. अशा वेळी रांगेत उभे राहून पैसे काढणे प्रत्येकालाच प्रकृतीमानानुसार जमेल असे नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच उन्हाच्या चटक्यामुळे तर अधिकच हाल सुरू झाले आहेत.