शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे दिवसा सुरू, रात्री बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:44 IST

विजेच्या बचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत असताना महापालिकेच्या बाणेर, बालेवाडी विद्युत विभाग मात्र याबाबत सुस्त आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन सध्या बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांना होत आहे.

बाणेर : विजेच्या बचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत असताना महापालिकेच्या बाणेर, बालेवाडी विद्युत विभाग मात्र याबाबत सुस्त आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन सध्या बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांना होत आहे. ‘पथदिवे रात्री बंद आणि दिवसा सुरू’ अशी परिस्थिती सध्या बाणेर, बालेवाडी भागात सर्रास सुरू आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने कारभार सुधारून विजेचा अपव्यय टाळण्याची अपेक्षा बाणेर, बालेवाडी भागातील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.पालिका पथदिव्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. नवीन पथदिवे लावणे. तसेच पथदिव्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती, हायमास्ट बसविणे यासाठी हा खर्च होतो. अंधार पडण्यास सुरुवात झाली की, रस्त्यावरील दिवे सुरू होणे व पहाटे वेळेवर बंद होणे अपेक्षित असते. मात्र बाणेर, बालेवाडी भागात काही ठिकाणी दिवसभर हे दिवे सुरूच असतात. त्याउलट अनेक ठिकाणी रात्रीही रस्त्यावरील दिवे बंद असतात. पथदिवे सुरू आहेत का? कुठे बिघाड आहेत का? हे विद्युत विभागातील इंजिनिअर तसेच संबंधित कर्मचाºयांनी वेळोवेळी सर्वेक्षण करून पाहणे आवश्यक आहे. मात्र पालिका कर्मचारी बाणेर, बालेवाडी भागात फिरून हे सर्वेक्षण करतात का, असा प्रश्न लोकांना पडला आहे.वारंवार नागरिकांनी तक्रारी करूनही परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.जागरूक नागरिकांनी अनेकदा ही बाब संबंधित कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून दिली, तरीही याबाबत अद्याप कार्यवाही होत नाही. त्यामुळे भरदिवसा पथदिवे सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळते; परंतु प्रत्यक्षात त्यांच्याच कर्मचाºयांच्या अनास्थेमुळे पथदिवे भरदिवसा सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय परिसरात होत आहे.आमच्या भागात पथदिवे असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. शहरात नव्हे, तर एखाद्या खेड्यात राहत असल्याची प्रचिती आम्हाला येत आहे. यासंदर्भात अनेक वेळा मागण्या केल्या; परंतु प्रशासन दखलच घेत नाही, असे अनेक नागरिकांनी सांगितले.