शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची वाढली उंची अन् घरे झाली खुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:10 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत.

- सुषमा नहेरकर-शिंदे पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतु ही रस्त्यांची कामे करताना कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा वापर न करता सिमेंट रस्त्यांची वाढवलेली भरमसाठ उंची व डांबरी रस्त्यांवरील दरवर्षी वाढत जाणारे थरच्या थर यामुळे शहरातील हजारो सोसायट्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.डांबरी रस्ते करतानादेखील कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा उपयोग न करता जुना डांबरी रस्ता खरडून न काढता जुन्या रस्त्यांवर पुन्हा डांबराचे थर दिले जातात. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरात बहुतेक भागात रस्त्यांची उंची सोसायट्या, घरांपेक्षा अधिक झाली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांचे जोते जमिनीच्या पातळीपासून ४५ सेंटिमीटर उंच असणे गरजेचे आहे. त्यानुसारच नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी दिली जाते; मात्र महापालिकेकडून नागरिकांना हा नियम लागू केला जात असला, तरी महापालिकेकडून मात्र रस्त्यांची कामे करताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. सिमेंट रस्ते करताना जुना डांबरी रस्ता तसाच ठेऊन त्यावर सिमेंटचा भलामोठा थर दिला जातो. तर डांबरी रस्ता करतानादेखील त्याच-त्याच रस्त्यांवर डांबराचे थरच्या थर वाढवले आहेत. यामुळे घर, सोसायट्यांच्या जोत्यापेक्षा रस्त्यांची उंची अधिक वाढल्याने नागरिकांच्या घरातपाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत, प्रभात रस्ता, कोथरूड, सिंहगड रोड, गोखलेनगर, भांडारकर रस्ता, कर्वेनगर, लक्ष्मी रस्ता आदी अनेक भागांमध्ये रस्त्यांची उंची घर, सोसायट्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या सोसायट्या, घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत काही नागरिकांनी महापालिकेकडे लेखी तक्रार दिली आहे.>तक्रार करूनही दखल नाहीगोखलेनगर येथील आमच्या कपिला सोसायटीमध्ये महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत नियमितपणे रस्त्यांची कामे करण्यात आले. डांबरी रस्त्यांवर थरच्या थर दिल्याने सोसायटीमधील रस्ते चकाचक झाले खरे. परंतु हे रस्ते करताना कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा उपयोग न केल्याने घराची उंची वाढवूनदेखील रस्त्यांची उंची वाढतच राहिल्याने पावसाचे रस्त्यावर येणारे पाणी थेट सोसायटी, घरामध्ये येते. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार करून देखील अद्याप काही दखल घेतली गेली नाही.-डॉ. अ. द. गोडबोले, नागरिक (गोखलेनगर)>कामे करताना दक्षता घेतली जातेशहरामध्ये कोणत्याही रस्त्यांची कामे करताना काही नियम व अटी ठरल्या आहेत. नव्याने एखाद्या रस्त्याचे काम करताना जुना रस्ता उखडून काढला जातो व त्यानंतर नवीन डांबरी अथवा सिमेंट रस्ता तयार केला जातो. त्यामुळे कोणत्याही रस्त्याचे काम करताना सोसायट्या, त्या परिसरातील घरांमध्ये उंची अधिक होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. परंतु काही ठिकाणी असे झाले असले तर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाईल.- अनिरुद्ध पावसकर,पथ विभागप्रमुख, महापालिका