शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे पालटले नशीब

By admin | Updated: January 22, 2016 01:26 IST

लोणावळा शहराच्या तुंगार्ली गावालगत राहूनही रस्ते या मूलभूत समस्येपासून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या पांगळोली,

लोणावळा : लोणावळा शहराच्या तुंगार्ली गावालगत राहूनही रस्ते या मूलभूत समस्येपासून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या पांगळोली, धनगरवस्ती व ठाकरवाडी या वस्त्यांचे रातोरात नशीब बदलले असून, या भागातील सुमारे दोन किमी अंतराच्या वन विभागाच्या हद्दीतील रस्ता चकाचक झाला आहे. निमित्त आहे, ते या वस्त्यांच्या डोक्यावर म्हणजेच डोंगरमाथ्यावरील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री व काही मोजके मंत्री यांच्या चिंतन शिबिराचे.स्वमालकीचे धरण असलेली लोणावळा ही महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद आहे. तुंगार्ली गावाच्या डोंगरावर नगर परिषदेचे हे धरण आहे. धरण परिसरात पांगळोली ही कातकरी व ठाकरवस्ती, बाजूला धनगरवस्ती व पुढे राजमाची किल्ल्याकडे जाणारा शेकडो वर्षांपासून पायवाटवजा रस्ता आहे. वन विभागाच्या हद्दीतून असल्याने हा रस्ता बनविण्यासाठी वन विभाग परवानगी देत नसल्याने आजपर्यंत या रस्त्यावर कधीच डांबर पडले नाही. फूटभर पाय मातीमध्ये जातील, एवढा लाल मातीचा फुफाटा या रस्त्यावर असायचा. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्यांना माती तुडवत व अंगभर माती घेऊनच जावे लागत असे. तुंगार्ली धरणाचे पाणी तुंगार्ली व गोल्ड व्हॅली या भागांना नगर परिषद पिण्यासाठी पाइपलाइनद्वारे देते. ही पाइपलाइन रस्त्याच्या मध्ये येत असल्याने ती रस्त्याच्या कडेला करण्यासदेखील वन विभाग मान्यता देत नसल्याने मागील अनेक वर्षांपासून या भागातील विकास ठप्प झाला होता. नगर परिषदेच्या मनोरंजननगरीचे या भागातील आरक्षणही रस्त्याअभावी धूळ खात पडले होते. मात्र, याच भागातील एका हॉटेलमध्ये खुद्द मुख्यमंत्री व काही मंत्री चिंतन शिबिरासाठी येणार म्हटल्यावर रात्रीत या भागाचे नशीब उजाडले. लाल मातीच्या फुफाट्याच्या रस्त्याचे तातडीने संपूर्ण डांबरीकरण झाले. एवढेच नाही, तर शहरातील ज्या ज्या रस्त्यांवरून मुख्यमंत्री व मंत्र्यांचा ताफा जाण्याची शक्यता आहे, ते सर्व रस्ते डांबरीकरण व पॅचवर्क करून चकाचक करण्यात आल्याने नागरिक अचंबित झाले आहेत. पांगळोली, ठाकरवाडीत सर्व झोपड्यांचा व रस्त्यांचा परिसर झाडलोट करून स्वच्छ करण्यात आला आहे.(वार्ताहर)