शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रोडकिलरला आरटीओचा दणका

By admin | Updated: October 9, 2014 05:20 IST

महापालिकेच्या ताफ्यातील हॅन्डब्रेक, इंडिकेटर, लाइट नसलेली ५०० पेक्षा जास्त रोडकिलर वाहने रस्त्यावर धावत असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले

पुणे : महापालिकेच्या ताफ्यातील हॅन्डब्रेक, इंडिकेटर, लाइट नसलेली ५०० पेक्षा जास्त रोडकिलर वाहने रस्त्यावर धावत असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायूवेग भरारी पथकामार्फत २०० वाहनांची तपासणी करून नादुरुस्त आढळून आलेल्या ४५ वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.महापालिकेच्या कंटनेर, कचरा गाडी, वॉटर टँकर व इतर वाहनांची धडक बसून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना शहरात नियमितपणे घडत आहेत. या पार्श्वभुमीवर पालिकेच्या सर्व वाहनांची स्थिती कशी आहे, याबाबतची तपशीलवार माहिती अजहर खान यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळविली. त्यातून धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. ‘लोकमत’ने त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच आरटीओकडून बुधवारपासून धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.आरटीओकडून दरवर्षी वाहनांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे वाहनमालकांवर बंधनकारक आहे. त्या वाहनांची कधीही अचानक तपासणी करण्याचे अधिकार मोटार वाहन कायद्यानुसार वाहन निरीक्षकांना आहेत. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या २०० वाहनांची तपासणी केली, त्यामध्ये ४५ वाहनांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. वाहनांमध्ये जास्त प्रमाणात त्रुटी आढळून आल्यास संबंधित वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र रद्द केले जाते. त्यानुुसार दोन वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र रद्द केले गेले. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने एक वाहन जप्त करण्यात आले. उर्वरित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरटीओने महापालिकेच्या वाहनाचालकांकडून ८६ हजार रूपयांचा दंड वसूल केला.याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, ‘महापालिकेच्या वाहनांची उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या व्हेईकल डेपो व्यवस्थापकांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये वाहनांची स्थिती योग्य राखण्याची जबाबदारी वाहनचालक व संबंधित वाहनमालकांवर आहे.’ (प्रतिनिधी)