शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे काम अजूनही रखडले

By admin | Updated: December 23, 2016 00:59 IST

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरातील नित्यानंद भवन भागातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम नगरसेवकांकडून हाती

पुणे : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरातील नित्यानंद भवन भागातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम नगरसेवकांकडून हाती घेण्यात आले खरे; मात्र हे काम पूर्णत्वास न नेता केवळ राडारोडा दूर करून ‘जैसे थे’ स्थितीतच ठेवण्यात आले आहे. या रस्त्यावर खोदकाम करताना पाण्याच्या पाइपलाइनला धक्का लागल्याने पाणी साचून चिखलाची स्थिती निर्माण झाल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांना यातून मुश्किलीने मार्ग काढून जावे लागत आहे. तसेच चारचाकी वाहन आत आणणे अशक्य झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना झोळीत घालून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ येत आहे. चांगल्या रस्त्याची अशी दुर्दशा केल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला असून, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जवळपास महिनाभरापूर्वी या भागातील रस्त्याच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली, हे काम सुरू करताना या कामाला किती कालावधी लागेल? त्याचे नियोजन कसे करण्यात आले आहे, याची कोणतीच माहिती या परिसरातील नागरिकांना देण्यात आली नाही. अचानक काम सुरू करण्यात आल्यामुळे या भागातील पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे दुरापास्त झाले आहे. चारचाकी वाहन या भागात आणणेच अवघड झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना अत्यवस्थ वाटू लागल्यास त्यांना झोळीत घालून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर येत आहे. यातच रस्त्याच्या खोदाईचे काम करताना अंतर्गत पाइपलाइनला धक्का लागल्याने पाण्याचे लिकेज सुरू झाले, रस्त्यावर पाणी साचल्याने चिखल साचला आहे. यातच नित्यानंदजवळील तीन बंगल्यांची मिळून असलेली अंतर्गत विजेची केबल तुटल्याने रहिवाशांना स्वत: २००० रुपयांची केबल आणण्याचा भुर्दंड पडला. (वार्ताहर)