शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रस्तारुंदीकरणाचे काम संथगतीने

By admin | Updated: March 21, 2017 05:26 IST

पुणे-नगर महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाच्या कामामध्ये संथपणा असल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना प्रवास करताना

वाघोली : पुणे-नगर महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाच्या कामामध्ये संथपणा असल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना प्रवास करताना धोका पत्करावा लागत आहे. रुंद करण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण केले नसल्याने वाहनांच्या अपघातात वाढ झाली असून, वाहतूककोंडीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम जागतिक बँक प्रकल्प विभागाकडून रस्तारुंदीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरूकरण्यात आले. रस्तारुंदीकरणाच्या एका बाजूचे सलग काम करण्याऐवजी जागा मिळेल तिथे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामध्ये अतिशय संथपणा आल्यामुळे महामार्गालगतचे व्यावसायिक, रुग्ण, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, वाहनधारक व नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या कडेला खोदकाम करून टाकलेल्या खडीमुळे छोटी-मोठी वाहने फसण्याचे, घसरण्याचे प्रकार वाढल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. नगर महामार्गावर वाहनांची सततची वर्दळ असल्यामुळे नेहमीच नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो. काही प्रमाणात का होईना कोंडी कमी व्हावी, या उद्देशाने रस्तारुंदीकरणाचे काम केले जात असले, तरी उलट काम संथपणे चालू असल्यामुळे व चालू असलेल्या कामावरील वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत आहे.रुंद करण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी शिवछत्रपती प्रतिष्ठानसह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.