शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोड रोमिओंवर आता दामिनी पथकाचा वॉच, निर्भया पथकाबरोबर करणार विद्यार्थी महिलांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:47 IST

महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बारामती शहरात निर्भया पथकापाठोपाठ आता आणखी दोन पोलीस पथक कार्यान्वित झाले आहेत. दामिनी आणि बीट मार्शल अशी या पथकांची नावे आहेत.

बारामती : महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बारामती शहरात निर्भया पथकापाठोपाठ आता आणखी दोन पोलीस पथक कार्यान्वित झाले आहेत. दामिनी आणि बीट मार्शल अशी या पथकांची नावे आहेत. या पथकांना स्वतंत्र दुचाकी देण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या संकल्पनेतून ही पथके जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यांत सध्या कार्यरत आहेत.पोलीस अधिक्षकांच्या संकल्पनेतून कार्यान्वित असलेल्या या पथकाला खास पथकाचे नाव असणा-या ‘डीझाईन’ केलेल्या दुचाकी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खास दुचाकींवर जाणारे हे पथक बारामतीकरांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.रहदारीच्या ठिकाणांसह महाविद्यालय परिसर, गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असणा-या भागात या पथकाचे ‘पेट्रोलिंग’ सुरू आहे.बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव म्हणाले, चोरी, लुटमार, छेडछाड आदी प्रकार रोखण्यासाठी तसेच तातडीने घटनास्थळी पोहचून गुन्हेगारांना जेरबंद करणे यासाठी या पथकाला दुचाकी देण्यात आल्या आहेत.बीट मार्शल पथकामध्ये एकूण १० पोलीस कर्मचारी कार्यान्वित आहेत. यामध्ये दिवसा पाच व रात्री पाच कर्मचारी शहरात गस्त घालणार आहेत. बीट मार्शल पथकाला दोन दुचाकी देण्यात आल्या आहेत. शिवाय या पथकाकडे प्रथमोपचार पेटी, वॉकीटॉकी तसेच ‘नाईट राउंड’साठी बॅटरी देण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९, रात्री ९ ते सकाळी ९ दरम्यान प्रत्येकी १२ तास ‘आॅन ड्युटी’ हे पथक कार्यरत असणार आहे. संशयित वस्तू, व्यक्ती, गर्दी, भांडणे, अपघात, महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठीया दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला देखील स्वतंत्र मोबाईल, वॉकीटॉकी देण्यात आला आहे. दामिनीपथकाची दुचाकी पाहुनच रोडरोमिओ पळ काढतात. सध्या या पथकाचा रोडरोमिओंनी चांगलाच धसका घेतला आहे. महाविद्यालयीन युवतींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी संबंधित महाविद्यालयाचे प्रमुख, प्राध्यापक यांना पथकाचे व्हिजिटिंग कार्ड देण्यात आले आहे. त्यावर मोबाइल क्रमांकासह ई-मेल आयडी नमूद करण्यात आला आहे, असे दामिनी पथकाच्या स्वप्ना पोतेकर यांनी सांगितले.>पोलीस कंट्रोल रूमची बीट मार्शल, दामिनी पथकावर नजरबीट मार्शल, दामिनी पथकाला तातडीने गुन्ह्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी दुचाकी देण्यात आल्या आहेत. या दुचाकी खास डिझाईन करण्यात आल्या आहेत. सध्या शहरात कुठेही उभी केलेली ही दुचाकी पाहिली तरी रोडरोमिओ पळ काढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी बसलोय याचे भान न ठेवता बसणारी ‘कपल’देखील याला अपवाद नाही. या पथकाच्या दुचाकीला ‘जीपीएस ट्रॅकर’ बसविण्यातआला आहे. या पथकातील कर्मचा-यांवर ‘कं ट्रोल रूम’ची नजर राहणार आहे, अस सूत्रांनी सांगितले.>तासाला समजणार ‘मोबाइल लोकेशन’नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या या पथकाला स्वतंत्र मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत.प्रत्येक तासाला या पथकातील कर्मचा-यांचे ‘मोबाइल लोकेशन’ पुणे पोलीस कंट्रोल रूमला समजणार आहे.