शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसाळ्यात शहरात रस्तेखोदाई

By admin | Updated: June 29, 2017 03:48 IST

महावितरण असो की गॅस पाईपलाईन, कितीही अत्यावश्यक सेवा असल्यानंतर पावसाळ्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या रस्तेखोदाईला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महावितरण असो की गॅस पाईपलाईन, कितीही अत्यावश्यक सेवा असल्यानंतर पावसाळ्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या रस्तेखोदाईला परवानगी न देण्याचे महापालिकेचे स्वत:चे धोरण आहे. परंतु, या धोरणालाच हरताळ फासून महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत सिमेंटचे रस्ते व स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या कामासाठी भरपावसाळ्यात सर्रास रस्तेखोदाई सुरू आहे. पावसामुळे या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून मोठा अपघात होण्याची भीती आहे.शहरात गेल्या काही वर्षांत मोबाईल तसेच शासकीय कंपन्यांकडून भूमिगत सेवावाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था होते. तसेच पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास अपघातदेखील होण्याची शक्यता असते. यामुळे बेसुमार खोदकामांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी खास खोदाई धोरण तयार केलेले आहे. यानुसार, पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरुस्ती आवश्यक असल्याने ३० एप्रिलपर्यंतच खोदकाम परवानगी दिली जाते. त्यानंतर संपूर्ण मे महिन्यामध्ये दुरुस्ती केली जाते. त्यानंतर केवळ एखादे अत्यावश्यक काम आले, तरच खोदकामास मान्यता देण्याचे विशेष अधिकार आहेत. महापालिकेच्या वतीने यंदा शहरात विविध सेवा पुरविण्यासाठी खासगी कंपन्यांना सुमारे २५० किलोमीटरच लांबीच्या रस्तेखोदाईला मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी अद्यापही ७० ते ८० किलोमीटरचे खोदलेले रस्ते पूर्ववत झाले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने अद्यापही हे रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरूच आहे.