शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग ते थेऊरगाव रस्त्याच्या डागडुजीस झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST

सुमारे ४ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अष्टविनायक गणपती विकास आराखड्यांतर्गत पुणे - सोलापूर महामार्ग थेऊर गाव ...

सुमारे ४ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अष्टविनायक गणपती विकास आराखड्यांतर्गत पुणे - सोलापूर महामार्ग थेऊर गाव ते केसनंद मार्गे लोणी कंद या रस्त्यासाठी १६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करीत या रस्ताच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. लोणीकंद ते कोलवडी या दरम्यानचे बहुतांश काम पूर्णत्वाकडे आले असले, तरी थेऊर फाटा ते थेऊर गाव या रस्त्यालगतच्या ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रुंदीकरणाला विरोध करून याविरोधात उच्च न्यायालायात याचिका दाखल करुन स्थगिती दिली आहे. यामुळे या रस्त्याचे काम सुमारे दोन वर्षांपासून बंद पडलेले आहे. रस्त्यावर पडलेल्या सुमारे एक ते दीड फुटाचे खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. पुणे - सोलापूर महमार्गावरून थेऊर, कोलवडी गावात ये - जा करणाऱ्या नागरिकांना तर रोजच या त्रासास सामोरे जावे लागते. खड्ड्यांमुुळे परिसरात २४ तास धुळीचे साम्राज्य असते. यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी या रस्त्याचे लवकर काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक, श्रीगणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांची आहे.

अशोक पवार ( आमदार, शिरूर - हवेली )

रस्ता बाधित शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामास न्यायालयातून स्थगिती आणल्याने या रस्त्याच्या कामास सुरुवात करता येत नव्हती. गेल्या दोन वर्षांच्या काळात रस्त्याची दुरवस्था झाल्याने, नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले होते. याचा विचार करून सध्या आहे त्याच रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. तसेच न्यायालयात गेलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून, रस्तारुंदीकरणाच्या कामासाठी मार्ग काढण्याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचवले आहे.

मिलिंद बारभाई ( सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता )

आमदार अशोक पवार यांच्या सूचनेनुसार जैसे थे स्थितीतच या रस्त्याची डागडुजी व डांबरीकरणास सुरुवात करण्यात आलेली आहे. रुंदीकरणात जे शेतकरी बाधित होणार आहेत त्यांंच्या समवेत पुढील आठवड्यात चर्चा करून त्यांना योग्य वाटेल असा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पुढील काही आठवड्यातच या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणही सुरू करण्याचे नियोजन केले आहे.