शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगड, सीताफळ, खरबूज पपईच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:08 IST

पुणे : मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी सर्व प्रकारच्या फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. सीताफळ, खरबूज, कलिंगड, पपईच्या दरात मागणी ...

पुणे : मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी सर्व प्रकारच्या फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. सीताफळ, खरबूज, कलिंगड, पपईच्या दरात मागणी वाढल्याने वाढ झाली आहे.

खरबुजाच्या दरात किलोमागे ५ रुपये, कलिंगड १ रुपया, तर पपईच्या दरात किलोमागे ३ रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मागणी वाढल्याने सीताफळाच्या दारात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने इतर सर्व फळांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

केरळ येथून अननस ५ ट्रक, मोसंबी १० ते १२ टन, संत्री १ टन, डाळिंब ४० ते ४५ टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू ५० क्रेट, चिक्कू दोनशे ते तीनशे बॉक्स, खरबुजाची २ ते ३ टेम्पो, कलिंगड २ ते ३ टेम्पो, सीताफळ ६ ते ८ टन इतकी आवक झाली.

पावसामुळे लिंबाला मागणी कमी झाल्याने भावात गोणीमागे २५ ते ३० रुपयांनी घट झाली आहे.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :- लिंबे (प्रति गोणी) : ६०-१७०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १२०-४००, ( ४ डझन ) : ७० ते १५०, संत्रा : (१० किलो) : ४००-१२००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड: ५-७, खरबूज : १०-२५, पपई : ८-१५, चिक्कू (१० किलो) २००-५००, पेरू (२० किलो): २५०-३००, सीताफळ : २०-२००.