शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वरंध घाटात दरड कोसळली

By admin | Updated: June 24, 2017 05:49 IST

महाड-भोर रस्त्यावरील वरंध घाटातील उंबार्डेवाडी येथे दरड पडल्याने भोर येथून कोकणाकडे जाणारी व महाड येथून भोरकडे येणारी वाहतूक सुमारे ६ तास ठप्प होती

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : महाड-भोर रस्त्यावरील वरंध घाटातील उंबार्डेवाडी येथे दरड पडल्याने भोर येथून कोकणाकडे जाणारी व महाड येथून भोरकडे येणारी वाहतूक सुमारे ६ तास ठप्प होती. यामुळे प्रवाशांचे व पर्यटकांचे अतोनात हाल झाले. सुमारे ३ तासांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेल्या दरडीची दगडमाती काढली. मात्र, रस्त्यावर पडलेला एक मोठा दगड जेसीबीलाही निघत नसल्यामुळे ब्लास्टिंग मागवले असून, दगड फोडून बाजूला केल्यावरच वाहतूक सुरळीत होईल.दुचाकी आणि लहान गाड्यांची वाहतूक सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. वाहतूक महाबळेश्वर व ताम्हणीमार्गे वळविण्यात आली आहे.भोरपासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोर-महाड रस्त्यावरील उंबार्डेवाडी येथील डोंगरातील मोठमोठे दगड, माती खाली येऊन संपूर्ण रस्ता दुपारी १२ नंतर बंद झाला होता. यामुळे महाडकडून भोरला येणारी व भोरकडून महाडकडे कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर, पुण्याहून महाडला जाणाऱ्या ७ एसटी बस अडकल्या असून महाडहून भोर-पुण्याकडे येणाऱ्या गाड्या अन्य मार्गाने गेल्या. याशिवाय भाजीपाला, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या व फिरायला जाणारे पर्यटक यांच्या गाड्या दुपारपासूनच अडकल्याने रस्त्यावर दोन-तीन किलोमीटरपर्र्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अनेक गाड्या परत फिरून महाडकडे निघून गेल्या.वरंध घाटात दुपारी १२ ते १ दरम्यान दरड कोसळल्यानंतर सुमारे ३ तासांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने भोर येथून घटनास्थळावर जेसीपीच्या मदतीने रस्त्यावरील दगडगोटे, माती बाहेर काढून संपूर्ण रस्ता खुला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, रस्त्यावर पडलेला एक मोठा दगड जेसीबीला निघत नसल्याने ब्लास्टिंग करून दगड फोडून वाहतूक सुरळीत करावी लागणार आहे. त्याला बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.