शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

नियमावली धुडकावल्याने गदारोळ

By admin | Updated: June 24, 2017 06:08 IST

महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांना प्रस्तावावर बोलू न देता बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करून घेण्याचा सपाटा भाजपाकडून लावण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांना प्रस्तावावर बोलू न देता बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करून घेण्याचा सपाटा भाजपाकडून लावण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या मुख्य सभेत तहकुबीवर विरोधकांना मत मांडू देण्याची सभागृहाची परंपरा मोडीत काढून सभा नियमावली धुडकावण्यात आल्याने मोठा गदारोळ झाला. बहुमताचा गैरवापर करून भाजपाकडून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असल्याची जोरदार टीका या वेळी विरोधी पक्षांनी केली.शुक्रवारी मुख्य सभा संपत असताना महापालिकेने कर्जरोखे घेतले म्हणून भाजपाच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मांडून सभा तहकुबी मांडली. याला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. या तहकुबीला विरोध असून यावर बोलायचे असल्याचे त्यांनी महापौर मुक्ता टिळक व नगरसचिव सुनील पारखी यांना सांगितले. त्यानंतर पारखी यांनी अभिनंदनाचा ठराव व तहकुबीवर मतदान घेतले. या वेळी ६३ विरुद्ध ३२ मतांनी हा ठराव व तहकुबी मंजूर करण्यात आली. मतदानानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाईल असे त्यांना वाटले होते; मात्र प्रत्यक्षात महापौरांनी लगेच कामकाजाचे पुढील विषय घेण्याचे निर्देश नगरसचिवांना दिले. महापौरांच्या या कृतीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला. वस्तुत: सभा कामकाज नियमावलीनुसार विरोधकांना मत व्यक्त करण्याची संधी दिली जाणे आवश्यक होते. मात्र महापौरांकडून हा संकेत डावलला गेल्याने विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक अविनाश बागवे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी याला जोरदार आक्षेप घेतला. विरोधी पक्षाचे सदस्य त्यांच्या जागेवरून उठून महापौरांसमोरील मोकळ्या जागेत आले. तहकुबीवर मत मांडण्याची संधी न देता केवळ बहुमताच्या जोरावर कामकाज करणे अयोग्य असल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. सत्ताधारी भाजपा बहुमताच्या जोरावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामकाज चालवत असून, सभागृहाचे संकेत, नियमावली पायदळी तुडवली जात आहे. महापौर पक्षपातीपणा करत आहेत. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना असा प्रकार कधीही घडला नाही. भाजपाकडून बहुमताचा गैरवापर केला जात आहे. विरोधी पक्षाच्या सभासदांच्या मागण्या धुडकावून लावल्या जातात, अशी टीका माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, भय्यासाहेब जाधव आदी नगरसेवकांनी केली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून चिडीचा नव्हे, तर रडीचा डाव खेळला जात आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली आहे.