शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांनी आखल्यात हद्दीच्या रेषा

By admin | Updated: December 1, 2015 03:35 IST

एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या

पिंपरी : एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या रिक्षाचालकाला परिसरात थांबूही देत नाहीत. रिक्षावाले त्यांच्याच व्यवसायातील रिक्षाचालकांना सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यातील या हद्दीच्या वादामुळे आर्थिक भुर्दंडाचा फटका प्रवाशांना बसतो आहे.पुणे शहरात रिक्षा चालविणारा एखादा रिक्षाचालक पिंपरी-चिंचवडमध्ये आला, तर त्याला परतीच्या प्रवासात विनाभाडे जावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याच ठिकाणी पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशाला त्या रिक्षात बसू दिले जात नाही. त्यामुळे त्या रिक्षाचालकाला रिकामी रिक्षा नेणे भाग पडते. अशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात भाडे घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकावर बेतते. पुण्याहून येताना-जाताना परतीचे भाडे मिळणार नाही, हे गृहीत धरून प्रवाशांना भरमसाट भाडे आकारले जाते. रिक्षावाल्यांच्या हद्दीच्या धोरणामुळे प्रवाशांना जादा भाडे देण्याचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. ही परिस्थिती केवळ पुण्यात जाणाऱ्या-येणाऱ्या रिक्षाचालकांची नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये अंतर्गत भागातही अशीच स्थिती आहे. वल्लभनगरच्या रिक्षातळाजवळ थेरगावचा रिक्षावाला गेला, तर त्याला थेरगावचे प्रवासी भाडे घेता येत नाही. भोसरीतील रिक्षावाल्याला पिंपरीतून पिटाळून लावले जाते. रिक्षातळावर काही जण मालकी हक्क असल्याच्या आविर्भाव दाखवितात. रिक्षा संघटना, रिक्षातळांवर थांबणारे रिक्षाचालक यांनी एकत्रित येऊन समन्वयाची भूमिका घेतल्यास समव्यावसायिक असलेल्या काही रिक्षाचालकांवर अन्याय होणार नाही. हद्दीच्या सीमारेषांची झळ त्यांना सोसावी लागणार नाही. विविध ठिकाणच्या प्रस्थापित रिक्षातळांच्या बाजूबाजूने व्यवसाय करणाऱ्यांनाही सामावून घेतल्यास त्यांच्यातील दरी कमी होईल. (प्रतिनिधी)- नव्याने रिक्षा व्यवसायात येणाऱ्यांना तर रिक्षातळ मिळविणे जिकिरीचे होते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या रिक्षा संघटना, वेगवेगळे नेते असल्याने त्यांना सामावून घेण्याच्या अडचणी येतात. रिक्षा संघटनांच्या नेत्यांशी ओळख नाही, त्यांना तर संघटनेचे सदस्य होण्यात अडचणी येतात. शहरातील अनेक रिक्षाचालक कोणत्याही रिक्षातळावर न थांबता रात्रीच्या वेळी सर्वत्र फिरून व्यवसाय करतात. त्यांना तर कोणीच वाली नाही. पोटासाठी धडपड म्हणून ते रात्री जागून व्यवसाय करतात. दिवसा त्यांना थांबण्यासाठी रिक्षातळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांनी फिरून व्यवसायाचा मार्ग निवडला आहे.