शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारांचे मापदंड पुन्हा अभ्यासले जावेत

By admin | Updated: March 8, 2016 01:22 IST

एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यास त्याचे फक्त अभिनंदन केले जाते. त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाबाबत मात्र कोणी काहीच सांगत नाही.

पुणे : एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यास त्याचे फक्त अभिनंदन केले जाते. त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाबाबत मात्र कोणी काहीच सांगत नाही. साहित्यविषयक पुरस्कारांचे मापदंड पुन्हा अभ्यासले जाण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.अक्षरधारा बुक गॅलरीने पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र दालन केले आहे. या दालनाचा शुभारंभ श्याम मनोहर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी मुक्तसंवाद साधला. मनोहर म्हणाले, की लेखकांना पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख होत नाही, तर फक्त राजकारण झाल्याचे सांगून टीका करावीशी वाटते. पण, एखाद्याला पुरस्कार मिळाल्यावर या भावना, टीका दिसत नाहीत. वाचकांना सोबत घेऊन पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे ‘लोक सर्वेक्षण’ करता आल्यास ग्रंथांची गुणवत्ता, वाचकांचे अभिप्राय समजून घेणे शक्य होईल. यातून लेखकाला आपल्या लिखाणातल्या उणिवा लक्षात येतील. लेखक या नात्याने पोषक आणि अनुकूल वातावरण सध्या आपल्याकडे नसल्याचे सांगून मनोहर म्हणाले, की सध्याच्या वातावरणात माणूस कुटुबांत, समाजात, मित्रमंडळींमध्ये काय आहे? समाजाचं, जगण्याचं, भाषेचं मोल त्याच्या आयुष्यात काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून, भारतीय म्हणून त्याचं काय संचित आहे, ही इतकी उतरंड माझ्या मनात कायम असते. त्या अंगाने मी कथा, कादंबऱ्यांचे लिखाण करीत असतो. समाजाचं ज्ञानक्षेत्र आपल्याकडे अजून विकास पावत नाहीय,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)