शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रांतोप्रांतीचे क्रांतीकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:13 IST

१९१० च्या सुमारास मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदिराम बोस असे अनेक क्रांतिकारक फासावर चढले. क्रांतियुद्धाची सुरुवात आता महाराष्ट्र, ...

१९१० च्या सुमारास मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदिराम बोस असे अनेक क्रांतिकारक फासावर चढले. क्रांतियुद्धाची सुरुवात आता महाराष्ट्र, पंजाब व बंगाल पुरती मर्यादित न राहता दक्षिणेत वणवा पेटू लागला.

तामिळनाडूतील त्रावणकोट संस्थानातील शेनकोटा या गावातील रघुपती अय्यर यांचा मुलगा वांछीनाथान याचा जन्म १८८६ मध्ये झाला. वडील एका मंदिरात पुजारी होते . जेमतेम शिक्षण पूर्ण करून वांछीनाथन वयाच्या विसाव्या वर्षी वनविभागात फॉरेस्ट गार्ड म्हणून नोकरीला लागला. क्रांतीकारक व्ही. व्ही. एस. अय्यर आणि एम. पी. टी. आचार्य यांनी सुरु केलेल्या 'भारत माता संगम' या क्रांतीकारकांच्या गुप्त संस्थेत वांछी सामील झाला. गुप्ततेची शपथ घेतली. त्याच सुमारास तिन्नेवेल्ली जिल्ह्यात नेमलेला ॲश या अधिकार्‍याने देशभक्त, संपादक यांना तुरुंगात टाकायला सुरुवात केली. स्वदेशी कंपन्या बंद पाडल्या. क्रांतीकारकांच्या रडारवर आता ॲश हा जिल्हाधिकारी आला होता. व्ही. व्ही. एस. अय्यर यांनी पांडिचेरीच्या फ्रेंच वसाहतीत गुप्त कार्य सुरु केले. वांछी अय्यर, धर्मराज अय्यर अशा अनेकांना त्यांनी पिस्तुलाची नेमबाजी शिकविली आणि ॲशला मारायची संधी क्रांतीकारकांना मिळाली. तिनेवेल्लीहून कोडाईकनालला जाणाऱ्या रेल्वेत ॲश होता त्याच गाडीत वांछी आणि त्याचा मेहुणा शंकर अय्यर यांनी जागा मिळवली. वाटेत 'मन्याची' या स्टेशनवर गाडी थांबली असता वांछीने खिडकीतून ॲशवर गोळ्या झाडल्या आणि पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चुकवत फलाटावरच्या स्वच्छतागृहात शिरला आणि आतून कडी घालून स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या तो दिवस होता १७ जून १९११...

--

फोटो २९ वांछीनाथन अय्यर(कॅम्पस पानावर)