शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द करा

By admin | Updated: October 3, 2015 01:11 IST

हमाल-मापाडींसारख्या अंगमेहनती-कष्टकऱ्यांचे जीवन बदलण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माथाडी कायद्यालाच सध्याचे राज्यकर्ते नख लावू पहात आहेत.

पुणे : हमाल-मापाडींसारख्या अंगमेहनती-कष्टकऱ्यांचे जीवन बदलण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माथाडी कायद्यालाच सध्याचे राज्यकर्ते नख लावू पहात आहेत. या कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द करावे तसेच माथाडी मंडळे सक्षम करावीत या मागणीसाठी गांधी जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ संलग्न संघटनांनी विविध आंदोलने केली. पुणे स्टेशन येथील महात्मा गांधीच्या पतुळ्याजवळ, हमाल पंचायत, मार्केटयार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना यांनी धरणे आंदोलन केले. पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट यांनी धरणे आंदोलनातच बैठक मारून मागण्या समजून घेतल्या. याबाबत हमाल पंचायतीत येऊन राज्य शासनाच्या वतीने काय तोडगा काढता येईल ते ठरवू, असे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे महामंडळाचे निमंत्रक नीतिन पवार यांच्यासह हमाल पंचायतीचे प्रभारी अध्यक्ष सुबराव बनसोडे, सरचिटणीस नवनाथ बिनवडे,संघटक गोरख मेंगडे,खजिनदार चंद्रकांत मानकर,कामगार युनियनचे अध्यक्ष नीतिन जामगे,तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट, संतोष जंगम आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘मागील सरकारने चेंबर आॅफ कॉमर्सच्या पत्रावर माथाडी कायद्याला हानी पोहचविणाऱ्या सुधारणा प्रस्तावित केल्या होत्या. सध्याच्या भाजप प्रणित सरकारने आल्या आल्या औद्यागिक क्षेत्रातून माथाडी वगळण्याचा प्रस्ताव ठेवला. पुन्हा प्रस्तावित किरकोळ व्यापार धोरणात किरकोळ व्यापाराच्या नावाखाली मोठ्या व्यापारी आस्थापनांनाही माथाडीतून वगळण्याचे कलम सध्याच्या सरकारने घातले आहे. ’’ (प्रतिनिधी)माथाडींच्या नावाने धटींगशाही : बापटहमाल पंचायत ही घाम गाळून पोट भरणाऱ्या हमालांची संघटना आहे. परंतू काही समाजविघातक घटक माथाडीच्या नावाने उद्योग व कारखान्यात धटींगशाहीने पैसे उकळतात. पंचायतीसारख्या संघटना व शासन मिळून अशा प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीचा बंदोबस्त करू, असे बापट यांनी सांगितले.