शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

By admin | Updated: February 22, 2017 02:21 IST

हवेली तालुक्यातील १३ जिल्हा परिषद गट व २६ पंचायत समिती गणांत किरकोळ बाचाबाचीचे अपवाद

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील १३ जिल्हा परिषद गट व २६ पंचायत समिती गणांत किरकोळ बाचाबाचीचे अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. हवेलीतील एकूण ५८ टक्के मतदान झाल्याची माहिती हवेलीचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.या वेळी प्रचारासाठी उमेदवारांना फक्त सहा दिवस मिळाल्याने त्यांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. या सहा दिवसांतील प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या या निवडणूक प्रक्रियेत आज मतदारराजाने आपले अमूल्य मत आज मतदान यंत्रात बंद केले. निवडणूक आयोगाने मतदान स्लिपा वाटण्याचे काम दिलेल्यांनी त्या बहुसंख्य ठिकाणी त्या वितरीत न केल्याने अनेक मतदार आपले मतदान कोठे आहे? याची विचारणा करताना दिसत होते. प्रत्येक पक्षाचे बुथवरील कार्यकर्ते मोबाईल अ‍ॅपवरून त्यांचा मतदार यादी व मतदान क्रमांक लिहून देत असताना दिसत होते. अनेकांची नावे मतदार यादीत नसणे, तसेच मतदान दुसऱ्या गणात असणे, असे प्रकार झाल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे आपले हक्काचे मतदार मतदान करू शकले नाहीत, याची रूखरूख अनेक उमेदवारांनी बोलून दाखवली.जास्तीत जास्त मतदान आपल्यालाच मिळावे, म्हणून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्व पक्षासह अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच धावपळ करत होते. यांसाठी खाजगी गाड्यांचा वापर करण्यात आला. कायम उपेक्षीत असलेले अपंग व वृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी चढाओढ लागली होती. बहुतांश ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढती होत आहेत. (वार्ताहर)नवतरुण मतदारांची संख्या वाढलीलोणीकंद : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पेरणे-वाडेबोल्हाई गटामध्ये मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. विशेषत: नव्याने मतदान करीत असलेल्या तरुणांमध्ये प्रचंड उत्साह होता.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचा हा बालेकिल्ला. त्यांचे खंदे समर्थक सुभाष जगताप यांच्या पत्नी सौ. कल्पना सुभाष जगताप यांना रिंगणात उतरवले, तर विरोधी आघाडीवर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप भोंडवे यांच्या पत्नी जयश्री संदीप भोंडवे यांच्या उमेदवारीने सर्व पक्षातील विरोधक एकवटले आहेत. या चुरशीच्या लढतीची उत्सुकता मतदानापर्यंत दिसून येत होती. लोणीकंद केंद्रावर सकाळी ७.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी मतदान केले. ३७७ नंबरच्या बूथवर सकाळी ९.३० वाजता ७.८४ टक्के मतदान झाले, तर १०.३० वाजता ४८०० मतांपैकी ८९१ मतदान झाले. केसनंद येथे सकाळी ७ वाजता कामगारवर्गाने गर्दी केली होती. दुपारी काही काळ सोडता दिवसभर रांगा होत्या. सकाळी १०.३० पर्यंत १२.१४ टक्के मतदान झाले,अशीच परिस्थिती बकोरी, पेरणे, डोंगरगाव, बुरकेगाव, फुलगाव, वढू, तुळापूर या गावांमध्ये होती. हवेलीत ३० संवेदनशील केंद्रे४जिल्ह्यातील सर्वांत जास्त ३० संवेदनशील मतदान केंद्रे हवेली तालुक्यात असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, १६ सहायक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, २८७ पोलीस कर्मचारी, १४० होमगार्ड यांच्यासमवेत प्रत्येकी एक जलद प्रतिकार पथक व एसआरपीएफचे प्लाटून असा बंदोबस्त लावण्यात आल्याने कसलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.