पिंपरी सांडस : हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने पंचक्रोशीतील बैलगाडा संघटनेच्या वतीने तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर बैलगाडाशर्यती चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.पंचक्रोशीतील बैलगाडा संघटनेने मंडल अधिकारी शिवाजी जाधव, तलाठी संजय भोर यांनी बैलगाडा संघटनेचे निवेदन स्वीकारले. महाराष्ट्र राज्यात बैलगाडाशर्यती गेली दोन वर्षांपासून बंद असल्याने राज्यातील शेतकरीवर्ग व बैलगाडामालक व शौकिनांत मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. बैलगाडाशर्यती चालू करण्याची मागणी कैलास सातव, प्रकाश कुटे, हरी पवार, सागर आव्हाळे, तुकाराम आव्हाळे, प्रवीण कुटे, सचिन भाडळे, राम भाडळे, नंदकुमार भाडळे ,महेंद कुटे, समीर भाडळे , पप्पू कुटे, पांडुरंग हरगुडे, सचिन सातव, सचिन भाडळे, रमेश आव्हाळे, माऊली कटके, सौरभ आव्हाळे, गणेश आव्हाळे, माऊली शेळके, बंटी शिवले, सौरभ गवळी, निखिल सुळके, संजय सातव पाटील, मच्छिंद्र सातव आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात
By admin | Updated: January 25, 2017 23:50 IST