शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी, चिंचवडचा निकाल उशिरा लागणार

By admin | Updated: October 17, 2014 00:19 IST

मतदानानंतर प्रशासन आता रविवारी (दि. 19) होत असलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार

पिंपरी : मतदानानंतर प्रशासन आता रविवारी (दि. 19) होत असलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार असून, जिल्ह्यातील 21 मतदारसंघाचे चित्र दुपारपयर्ंत स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.  
उमेदवार संख्येवरुन मोजणीसाठी किती वेळ लागेल याचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. मोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात 21 टेबल असून एक टेबल टपाली मतदानाच्या मोजणीसाठी असणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षकही लक्ष ठेवणार आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्याची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. फेरीनिहाय मतांची माहिती आयोगाला पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा एक फेरी पूर्ण झाल्यावरच दुसरी फेरी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रत्येक फेरीसाठी साधार वीस मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे.  
भोर, आंबेगाव आणि मावळ या मतदारसंघात सर्वात कमी 
मतदार असल्याने या ठिकाणचा निकाल लवकर लागण्याची 
शक्यता आहे. तर इंदापूर, चिंचवड, पिंपरी, दौंड, शिवाजीनगर, वडगावशेरी या मतदारसंघात 18 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने या ठिकाणचा निकाल लागण्यास 
उशीर होईल.(प्रतिनिधी)
 
मतमोजणी बालेवाडी, कोरेगाव पार्क येथे 
पुणो शहरातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, पुणो कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ, हडपसर आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. कोथरुड, खडकवासला, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या पाच विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी-म्हाळुंगे येथील क्रीडा संकुलात, तर ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांसह एसआरपीएफचे जवानही  तैनात असतील.