शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत गुणांअभावी रखडले ९३ विद्यार्थ्यांचे निकाल

By admin | Updated: August 13, 2016 05:19 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ४२ महाविद्यालयांनी ९३ विद्यार्थ्यांचे विविध विषयांचे अंतर्गत गुण परीक्षा विभागाकडे न पाठविल्याने त्यांचे निकाल रखडल्याचे समोर आले

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ४२ महाविद्यालयांनी ९३ विद्यार्थ्यांचे विविध विषयांचे अंतर्गत गुण परीक्षा विभागाकडे न पाठविल्याने त्यांचे निकाल रखडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाविद्यालयांच्या चुकीमुळे संंबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत एप्रिल-मे २०१५ मध्ये विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात आल्या. उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू असताना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण परीक्षा विभागाकडे पाठविणे अपेक्षित असते. त्यानुसार लेखी परीक्षा व अंतर्गत गुण एकत्रित करून निकाल जाहीर केला जातो. परीक्षा विभागाने बहुतेक विद्याशाखांचे निकाल जाहीर केले आहेत. मात्र शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, कला व विज्ञान विद्याशाखांमधील ९३ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता ४२ वरिष्ठ महाविद्यालयांनी त्यांचे अंतर्गत गुण विद्यापीठाकडे पाठविले नसल्याचे उघडकीस आले. ही बाब समोर आल्यानंतर परीक्षा विभागात बैठक घेऊन संबंधित महाविद्यालयांना दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.