पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी २९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहरातील परवानाधारक ३६९ शस्त्रधारकांनी त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत, अशी माहिती विशेष शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त दीपाली घाटगे यांनी दिली.विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलिसांनी प्रतिबंधात्माक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत पोलिसांकडून २८६ जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात पोलिसांनी कारवाई करून, एक गावठी कट्टा, दोन तलवार, चार कोयते अशी बेकायदेशीर शस्त्रे जप्त केली आहेत. शहरामध्ये १२ हजार जणांना शस्त्रपरवाने वितरीत करण्यात आले आहेत. त्यापैकी ३६९ जणांनीच त्यांची शस्त्रे जमा केली आहेत. आचारसंहितेच्या काळात परवानाधारकांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात येतात. निवडणुकांमध्ये सामाजिक स्वास्थ्य जपण्याच्या हेतूने व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याचा यामागे प्रयत्न असतो. (प्रतिनिधी)
तीनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By admin | Updated: September 24, 2014 06:11 IST