शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या पालनपोषणाची जबाबदारी मुलांवरच

By admin | Updated: May 13, 2014 02:00 IST

दुसर्‍याच्या घरी राबून तिने स्वत:चा संसार केला... पदरात पक्षाघात झालेला पती आणि शारीरिक-मानसिकरीत्या अपंग मुलासह तीन मुले... परदेशात स्वयंपाकी बनून काम करत राहिली...

पुणे : दुसर्‍याच्या घरी राबून तिने स्वत:चा संसार केला... पदरात पक्षाघात झालेला पती आणि शारीरिक-मानसिकरीत्या अपंग मुलासह तीन मुले... परदेशात स्वयंपाकी बनून काम करत राहिली... कष्टाच्या पैशाने पुण्यात घर घेतले... धाकट्या मुलालाही सहमालक केले... ज्या मुलांवर तिने आयुष्य ओवाळून टाकले... त्यातल्याच धाकट्याने घर बळकाविण्यासाठी आईसह इतरांना त्रास देऊन नाकीनऊ केले. ६३व्या वर्षीही कष्टाने शरीराबरोबरही तिचे मनही कणखर झाले होते. या वयात ती हिमतीने न्यायालयाची पायरी चढली अन जिंकलीही. या प्रकरणी सुशीला (६३) आणि त्यांचा मुलगा आशिष (३८, दोघांची नावे बदलली आहेत) यांनी अ‍ॅड. कविता शिवरकर यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. सुशीला यांनी आपला मुलगा सुभाष आणि सून रमा (नावे बदलली आहेत) यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. सुशीला या त्यांच्या पती, आई आणि मुलासह मुंबई येथे राहत होत्या. त्यांच्या पतीला पॅरेलिसिसचा झटका आल्यामुळे कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी स्वयंपाक आणि धुणी-भांडी करण्याचे काम सुरू केले. घरची जबाबदारी आईवर पडललेली पाहून मोठ्या मुलाने शिक्षण सोडून काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा एक मुलगा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग आहे. मुलांना नीट शिक्षण देता आले नाही म्हणून त्यांनी सुभाषला चांगले शिक्षण द्यायचे ठरविले. त्याला बेंगळुरु येथे नौदलामध्ये शिकविण्यास पाठविले. मात्र, त्याने शिक्षण अर्धवट सोडले. त्याला दुबई येथे कामासाठी त्यांनी नेले. मात्र, तिथे एका मुलीच्या प्रेमात पडून त्याने मोठ्या भावाच्या आधीच लग्न केले. मोठा मुलगाही दुबई येथे असल्यामुळे त्या परत माघारी आल्या. मुंबई येथील त्यांचे राहते घर अपुरे पडेल म्हणून सुशीला यांनी ते घर विकून पुण्यात घर घेतले. पुण्यात आपल्या कुटुंबाबरोबर त्या राहू लागल्या. एक मुलगा अपंग असल्यामुळे सुशीला त्याला घर देतील या कारणावरून सुभाष व रमा यांनी भांडण करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली. त्यांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला; तसेच पाच हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)